Apple Warns Users : मोबाईल चार्जिंगला ठेवून शेजारी झोपताय? अॅपलचा युजर्सना धोक्याचा इशारा, अॅन्ड्रॉईडसाठीही महत्त्वाचा
Apple Warns iPhone Users : फोन चार्ज होत असताना त्याच्या शेजारी झोपण्याबाबत अॅपलने आयफोन वापरकर्त्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : सध्या मोबाईल (Mobile Use) फोनशिवाय आपण जगू शकत नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, आपण दिवसभर तासनतास मोबाईलवर असतो. अनेक वेळा आपण झोपतानाही उशाजवळ मोबाईल ठेवतो. अनेकांना रात्री झोपताना उशाजवळ मोबाईल चार्जिंगला लावण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर ही बातमी नक्की वाचा. फोन चार्जिंगला लावला असताना त्याच्या शेजारी झोपण्याबाबत अॅपलने (Apple) धोक्याचा इशारा दिला आहे.
मोबाईल चार्जिंगला ठेवून शेजारी झोपताय?
अॅपल (Apple) ने चार्जिंगला लावलेल्या फोनच्या शेजारी झोपण्याच्या वाईट सवयीबाबत चिंता व्यक्त करत धोक्याचा इशारा दिला आहे. आयफोनने याबाबत धोक्याच्या इशारा देत आग लागण्याचा धोका, विजेचा धक्का लागण्याचा धोका, तसेच यामुळे जखम होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर यामुळे मालमत्तेचंही नुकसान होऊ शकतं असं अॅपल कंपनीने म्हटलं आहे. (Mobile Phone Charging while Sleeping)
अॅपलचा युजर्सना धोक्याचा इशारा
अॅपलने (Apple) आयफोन (iPhone) युजर्ससाठी धोक्याचा इशारा जारी करत फोन वापरण्याच्या योग्य पद्धतींचा उल्लेख केला आहे. अॅपलने युजर्संना त्यांचा फोन हवेशीर आणि मोकळ्या भागात चार्जिंगला लावण्यास सांगितलं आहे. तसेच फोन चार्जिंगला लावला असताना विजेचा बोर्ड आणि मोबाईल यांच्या संपर्कात ब्लँकेट असणार नाही याची खात्री करण्यास सांगितलं आहे. तसेच फोन उशाखाली ठेवणं टाळण्याचाही सल्ला दिला आहे. (Apple Warns iPhone Users)
अॅन्ड्रॉईड युजर्सनेही खबरदारी बाळगणं आवश्यक
दरम्यान, अॅपलने हा धोक्याचा इशारा आयफोन युजर्ससाठी दिला असला, तरी सर्वच स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. अॅन्ड्रॉईड युजर्सनेही या खबरदारी बाळगणं आवश्यक आहे. फोन चार्जिंगला लावून त्याच्या शेजारी झोपल्यास मोबाईल जास्त गरम होऊन आग लागू शकते. त्यामुळे ब्लँकेट किंवा उशीखाली ठेवू फोन चार्ज करताना सावधगिरी बाळगा आणि असं करणं टाळा. (Android Mobile Charging)
अॅपलच्या युजर्सना आणखी काही सूचना
Apple युजर्सना त्यांच्या अधिकृत "मेड फॉर आयफोन" केबल्स आणि चार्जर वापरण्याची शिफारस केली आहे. हे केबल्स आणि चार्जर सुरक्षिततेच्या मानकांचे पालन करतात त्यामुळे अपघात होण्याचा धोका कमी असतो. तसेच कंपनीन स्वस्त पर्यायांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.