एक्स्प्लोर

iPhone17 Launch : अधिक गतिमान, अधिक आकर्षक! ॲपलचा धमाका, iPhone 17 आणि AirPods Pro 3 मध्ये जबरदस्त फीचर्स , जाणून घ्या किंमत

ॲपल (Apple Launch 2025) ने नवीन iPhone 17 आणि AirPods Pro 3 सादर केले आहेत. iPhone 17 मध्ये Ceramic Shield 2, A19 Chip, 48MP कॅमेरा आणि ProMotion Display देण्यात आला आहे.

Apple iPhone17 Launch : ॲपल (Apple) पुन्हा एकदा टेक्नॉलॉजी विश्वात चर्चेत असून कंपनीने आपल्या नवीन iPhone 17 आणि AirPods Pro 3 चे अनावरण केलं आहे. टिकाऊपणा, डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत आयफोन 17 सिरीजने मोठी झेप घेतली आहे. नवीन Ceramic Shield 2, जबरदस्त कॅमेरा अपग्रेड्स, A19 चिपचा वेग आणि AirPods Pro 3 मधील दुप्पट नॉइज कॅन्सलेशन (Noise Cancellation) यामुळे या दोन्ही प्रॉडक्ट्सकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आयफोनची किंमत 82,000 पासून सुरू होत असून ती 2,29,000 पर्यंत आहे.

iPhone 17 मध्ये आता अधिक टिकाऊपणा (Durability), आकर्षक डिझाईन अपग्रेड्स (Design Upgrades) आणि वेगवान परफॉर्मन्स (Faster Performance) अशी वैशिष्टे आहेत. नवीन मॉडेलमध्ये Ceramic Shield 2 दिले असून ते आधीपेक्षा तीनपट अधिक स्क्रॅच-रेझिस्टंट (Scratch Resistant) आहे. त्यासोबतच कडकपणासाठी (Hardness) ॲपलने खास कोटिंग केले आहे आणि सात-स्तरीय अँटी-रिफ्लेक्टिव्ह फिनिश (Anti-Reflective Finish) दिले आहे, ज्यामुळे स्क्रीनवरील ग्लेअर कमी होते.

iPhone 17 series price in India : आयफोनची किंमत किती?

iPhone 17 256GB: ₹82,900

iPhone 17 512GB: ₹1,02,900

iPhone Air 256GB: ₹1,19,900

iPhone Air 512 GB: ₹1,39,900

iPhone Air 1TB: ₹1,59,900

iPhone 17 Pro 256GB: ₹1,34,900

iPhone 17 Pro 512GB: ₹1,54,900

iPhone 17 Pro 1TB: ₹1,74,900

iPhone 17 Pro Max 256GB: ₹1,49,900

iPhone 17 Pro Max 512GB: ₹1,69,900

iPhone 17 Pro Max 1TB: ₹1,89,900

iPhone 17 Pro Max 2TB: ₹2,29,900

iPhone 17 Color Models : आयफोन 17 पाच रंगांमध्ये

हा फोन आता पाच रंगांमध्ये (Colours) उपलब्ध आहे लॅव्हेंडर, सेज, मिस्ट, ब्लू आणि ब्लॅक. यात थोडासा मोठा 6.3-इंच ProMotion डिस्प्ले (Display) आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट देतो आणि बॅटरी कार्यक्षमतेसाठी Always-On मोडमध्ये तो 1Hz पर्यंत खाली जातो.

अधिक सुलभ परफॉर्मन्स

परफॉर्मन्सच्या दृष्टीने, iPhone 17 मध्ये ॲपलचा नवीन A19 चिप (3nm Process) बसवण्यात आला आहे. यात 6-कोर CPU, 5-कोर GPU आणि अधिक सुधारित न्यूरल इंजिन (Neural Engine) आहे, ज्यामुळे ऑन-डिव्हाइस AI कामगिरी अधिक वेगवान होते. वाढलेली मेमरी बँडविड्थ (Memory Bandwidth) मुळे मल्टिटास्किंग आणि ग्राफिक्स-इंटेन्सिव्ह ॲप्ससाठी परफॉर्मन्स आणखी चांगला झाला आहे.

iPhone17 Launch : अधिक गतिमान, अधिक आकर्षक! ॲपलचा धमाका, iPhone 17 आणि AirPods Pro 3 मध्ये जबरदस्त फीचर्स , जाणून घ्या किंमत

iPhone 17 Camera : कॅमेरा कसा आहे?

कॅमेराच्या बाबतीत (Camera Upgrades), यात 48MP मुख्य सेन्सर आणि 12MP 2x टेलिफोटो लेन्स आहे, ज्यामुळे अधिक स्पष्ट तपशील आणि फोटो काढण्याची लवचिकता मिळते.

एकूणच, टिकाऊपणा, वेग आणि डिस्प्लेतील सुधारणा यामुळे iPhone 17 ने ॲपलच्या फ्लॅगशिप फोनसाठी एक नवा उच्च दर्जा निर्माण केला आहे.

iPhone17 Launch : अधिक गतिमान, अधिक आकर्षक! ॲपलचा धमाका, iPhone 17 आणि AirPods Pro 3 मध्ये जबरदस्त फीचर्स , जाणून घ्या किंमत

Apple AirPods Pro : एअरपॉड्स प्रो 3 लाँच

ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक (Tim Cook) यांनी नव्या एअरपॉड्स (AirPods) संदर्भात नव्याने डिझाईन केलेल्या लिक्विड ग्लास यूआय (Liquid Glass UI) चे विशेषत्व अधोरेखित केले. ॲपलच्या प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये यूजर्सची काळजी घेण्याची तत्वे अंतर्भूत आहेत असं ते म्हणाले.

ॲपल एअरपॉड्स हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय इयरफोन्सपैकी एक आहेत. एअरपॉड्स प्रो (AirPods Pro) मध्ये एंड-टू-एंड हिअरिंग फंक्शनॅलिटी (end to end hearing functionality) उपलब्ध करून दिली गेली आहे. तसेच ॲपल सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असून पुढील पिढीचे एअरपॉड्स आणण्यासाठी कंपनी सातत्याने नवकल्पना करत आहे.

एअरपॉड्स प्रो 3 (AirPods Pro 3) मध्ये याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत दुप्पट अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation) आहे आणि ते चारपट अधिक प्रभावी ठरते. यामधील ट्रान्सपेरन्सी मोड (Transparency Mode) मुळे वापरकर्त्यांना आजूबाजूचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात.

ॲपल एअरपॉड्स प्रो 3 (Apple AirPods Pro 3) आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी बाजारात येणार आहेत. यांची किंमत 200 डॉलर्स (USD 200) इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र भारतातील किंमत (India Price) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
Weekly Horoscope : सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Bharatshet Gogawale on Raigad Election : दोन्ही पक्षाकडून संबंध ताणले जाऊ नये याची काळजी घ्यावी
Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
Weekly Horoscope : सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
Nitin Gadkari: पुण्यात 50 हजार कोटींचे रस्ते प्रकल्प, 16000 कोटींच्या सुस्साट रस्त्याने दोन तासांत छ. संभाजीनगरला पोहोचणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा
पुण्यात 50 हजार कोटींचे रस्ते प्रकल्प, 16000 कोटींच्या सुस्साट रस्त्याने दोन तासांत छ. संभाजीनगरला पोहोचणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा
Embed widget