एक्स्प्लोर

आयफोन 16 साठी ॲपलची भन्नाट ऑफर! तब्बल 25000 रुपयांनी स्वस्त मिळू शकतो फोन; जाणून घ्या नेमकं कसं?

iPhone 16 Discount : काही दिवसांपूर्वी आयफोन 16 सिरीज लॉन्च करण्यात आली होती. या सिरीजमधील फोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत.

मुंबई : काही दिवसांपूर्वी ॲपल या टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनीने iPhone 16 सिरीज लॉन्च केली. गेल्या वर्षभरापासून ॲपलच्या या फोन सिरीजची वाट पाहिली जात होती. या नव्याकोऱ्या फोनमध्ये ॲपल कंपनीने दमदार नवे फिचर्स आणले आहेत. 13 सप्टेंबरपासून या फोनसाठी प्री-बुकिंग केलं जात आहे. तर 20 सप्टेंबरपासून या फोनच्या वितरणाला सुरुवात होईल. दरम्यान, आयफोन 16 सिरीजमधील चारही फोन चांगलेच महाग आहेत. मात्र हे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी ॲपल कंपनीने दिली आहे. या संधीअंतर्गत तुम्हाला या फोनच्या खरेदीवर 25000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. 

ॲपल कंपनीने लॉन्च केलेल्या आयफोन 16 सिरीजच्या चार फोनचे फिचर्स समोर आले आहेत. तुम्हाला भारतात हा फोन खरेदी करायचा असेल तर  iPhone 16 साठी तुम्हाला कमीत कमी 79,900 रुपये मोजावे लागतेल. iPhone 16 Plus या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे. तर iPhone 16 Pro या फोनची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे. iPhone 16 Pro Max या फोनची किंमत 1,44,900 रुपये आहे. 

ॲपल कंपनीची नेमकी ऑफर काय आहे? 

ॲपल कंपनीने आपल्या यूजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत आयफोन 16 वर मोठी सूट मिळत आहे. सध्या ॲपल कंपनीतर्फे आपल्या अगोदरच्या युजर्ससाठी ट्रेड-इन ऑफर दिली जात आहे. म्हणजेच एक्स्चेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला आयफोन 16 स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. Apple iPhone 16 (128GB) या आयफोन 16 सिरीजच्या बेसिक मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. मात्र एक्स्चेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला हा फोन स्वस्तात मिळू शकतो. तुमच्याकडे जुना iPhone 14 असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही आयफोन 16 खरेदी करू शकता. या एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला 25,000 रुपयांची सूट मिळू शकते. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला आयफोन 16 हा फोन 54,900 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.  

iPhone 16 Series चे नेमके फिचर्ज काय

डिझाईन आणि डिस्प्ले : iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये अनुक्रमे 6.1 इंच आणि 6.7 इंची OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. iPhone 16 Pro आणि Pro Max या फोनमध्ये अनुक्रमे 6.3 इंच आणि 6.9 इंची डिस्प्ले आहे. सर्वच मॉडेल्सवर मायक्रो-लेन्स टेक्नोलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. 

प्रोसेसर: iPhone 16 आणि 16 Plus मध्ये A18 बायोनिक चिप आहे. तर Pro मॉडल्स मध्ये A18 प्रो चिप आहे. यामुळे फोनचा परफॉर्मन्स आणि बॅटरी लाईफ सुधारते. 

सॉफ्टवेअर: आयफोन 16 सिरीजच्या सर्वच मॉडेल्सवर  iOS 18 ही ऑपरेटिंग सिस्टिम रन करता येते. या सिस्टिमध्ये ॲपल इंटेलिजेन्सचे अनेक फिचर्स येतात. 

बॅक कॅमरा: Pro मॉडल्समध्ये ॲडव्हान्स कॅमेरा सिस्टिीम आहे. प्रो मॉडेल्समध्ये 48MP चा मुख्य कॅमेरा तसेच 48MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12MP चा टेलीफोटो झूम लेन्स कॅमेरा आहे. या फोनमध्ये नवे कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले आहे. 

फ्रन्ट कॅमरा: आयफोन 16 च्या सर्वच सिरीजमध्ये 12MP फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिकDhananjay Mahadik Ladki Bahin | पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो पाठवा, व्यवस्था करुAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : निकालानंतर सत्तेत सहभागी होणार, Imtiaz Jaleel ExclusiveDevendra fadnavis On vinod Patil :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद पाटील भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget