(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Sale : Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल लवकरच होणार सुरू मिळणार बंपर ऑफर
स्मार्टफोन्सपासून ते या उपकरणांपर्यंत, तुम्हाला सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळेल, येथे जाणून घ्या की कोणत्या फोनवर आणि कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर किती सूट मिळेल.
Amazon Great Freedom Festival sale : स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर आहे, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सेल सुरू करण्यासाठी आता सज्ज आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सेलमध्ये स्मार्टफोनपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींवर बंपर सूट ग्राहकांना मिळू शकते. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 5 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 9 ऑगस्टपर्यंत चालेल. तुम्ही Amazon प्राइम सदस्य असल्यास, तुम्ही एक दिवस अगोदर या सेलचा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला किती सूट मिळू शकते आणि किती बचत होऊ शकते ते जाणून घ्या.
Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल
सेलच्या टीझर पेजनुसार, ग्राहकांना SBI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के सूट मिळू शकेल. अॅमेझॉन सॅमसंग, वनप्लस, रियलमी आणि इतर ब्रँडच्या फोनवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत देऊन स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ऑफरमध्ये तुम्हाला मिळू शकते.
लॅपटॉप, इअरबड्सवर 75 टक्के सूट
जर तुम्हाला लॅपटॉप किंवा वायरलेस इयरबड्स खरेदी करायचे असतील तर काही दिवस प्रतीक्षा करा. त्यानंतर तुम्ही या सेलमध्ये लॅपटॉप, इयरफोन, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर 75 टक्के सूट घेऊ शकाल. Amazon नुसार, तुम्हाला Apple आणि इतर ब्रँडेड टॅब्लेटवर देखील 50 टक्के सूट मिळू शकते.
स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवर बँक ऑफर
याशिवाय लॅपटॉपवर 40,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर आणि हेडफोनसह स्पीकरवर 75 टक्क्यांपर्यंतचा फायदा मिळेल. ऑफरमध्ये फ्लॅट डिस्काउंट आणि बँक कार्ड्सवर सूट देखील असू शकते. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल इव्हेंट दरम्यान विक्रीमध्ये स्मार्ट टीव्ही देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि काही टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
सध्या, Amazon ने कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही उत्पादनाची किंमत जाहीर केलेली नाही. हे शक्य आहे की प्लॅटफॉर्म लवकरच संपूर्ण माहीती लवकरच ग्राहकांपर्यंत पोहोचवतील.
Amazon ने अजून Freedom Festival Sale मधील आॅफर्स आणि डील्सबद्दल जास्त खुलासा केलेला नाही. परंतु SBI वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड आणि EMI वर 10 % सूट मिळू शकते. तसेच ग्राहकांना एका वर्षात 5000 रूपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल. तर 30 लाखांहून अधिक उत्पादनांवर 30% पर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल.
- Amazon स्मार्टफोन आणि अॅक्सेसेरीजवर 40% सूट देण्यात येणार आहे.
- लॅपटाॅप आणि गेमिंग लॅपटाॅपवर 40% पर्यंत सूट.
- स्मार्टवाॅचवर 80% पर्यंत सूट.
- स्मार्ट टिव्हीवर 60% पर्यंत सूट.
- हेडफोन, स्पीकर आणि संगणक उपकरणांवर 75% सूट.
- Tablet वर 50% पर्यंत सूट.
- अलेक्सा , फायर टिव्ही वर 55% पर्यंत सूट.
- स्टोरेज डिव्हाइसवर 70% पर्यंत सूट.
इतर महत्वाच्या बातम्या
Samsung : Samsung Galaxy Watch 6 आणि Galaxy Tab S9 भारतात लाँच, जाणून घ्या याच्या भन्नाट फिचर्सबद्दल