Flight Tracker : तुमचं Flight Delay झालंय का? विमान किती वेळ उशीरा येणार आहे? 'या' 7 फ्लाइट ट्रॅकिंग अॅप्स देणार एका झटक्यात सगळी माहिती!
तुम्ही तुमच्या फ्लाईटची योग्य माहिती तुमच्याकडे ठेवाल तर तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही तुम्हाला विमान ट्रॅक करणारे ॲप्स आणि वेबसाईट्स सांगणार आहोत. जे अॅप्स तुमचा वेळ वाचवतील आणि प्रवासही नीट होईल.
Flight Tracker : प्रवासाला निघताना अचानक रस्त्यामध्ये तुम्हाला (Flight Tracker) कळत की तुमची फ्लाईट लेट होणार आहे किंवा मग फ्लाईट कॅन्सल होणार आहेय या गोष्टी सध्या खूप कॉमन झाल्या आहेत. मात्र या कारणामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. जर तुम्ही तुमच्या फ्लाईटची योग्य माहिती तुमच्याकडे ठेवाल तर तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होऊ शकतो. आम्ही तुम्हाला विमान ट्रॅक करणारे ॲप्स आणि वेबसाईट्स सांगणार आहोत. जे अॅप्स तुमचा वेळ वाचवतील आणि प्रवासही नीट होईल.
FlightRadar 24
FlightRadar 24 हा अशाप्रकारचा ॲप आहे जो आयफोन आणि आयपॅड यात वापरला जाऊ शकतो. या ॲपमध्ये जगातील सगळ्या विमानांचा रियल टाईम ट्रॅक करू शकतात. तुमचा फोन आकाशाच्या दिशेने दाखवून तुम्ही वर उडणारे विमान कोणते आहे, जाणून घेऊ शकता. तुम्ही ते विमान 3Dमध्ये पाहू शकता आणि विमान कुठून कोणत्या दिशेला जात आहे, याचीदेखील माहिती मिळू शकते.
FlightStats
FlightStats याचा वापर करून तुम्ही अगदी सहज रित्या जाणून घेऊ शकता की तुमची फ्लाइटईट कधी टेक ऑफ करणार आहे आणि कुठे जाणार आहे. या ॲपमार्फत तुम्ही जगातल्या सगळ्या फ्लाइटची लाईव्ह माहिती मिळवू शकता. मग यामध्ये त्या प्लाईटचा नंबर असो ,एअरपोर्टचे नाव असो किंवा मग रस्ता असेल,या सगळ्या बद्दलची माहिती तुम्ही अगदी सहजरीत्या जाणून घेऊ शकता.
FlightAware
FlightAware हे ॲप विमानाची प्रत्येक गोष्ट सांगतो. विमान कुठे आहे,ते कधी उड्डाण करणार आहे, कधी लॅंड होणार आहे अशा विविध प्रकारची माहिती तुम्हाला या ॲपद्वारे मिळू शकते. जगभरातील प्रत्येक फ्लाईटबद्दल तुम्हाला या ॲपमुळे माहिती मिळू शकते. फक्त यासाठी तुम्हाला त्या फ्लाईटचा नंबर ,एअरपोर्ट किंवा फ्लाईटचा मार्ग माहित असणे गरजेचे आहे.
Planes Live
Planes Live हा एक फ्री ॲप आहे. याचा वापर करून तुम्ही जगभरातील अनेक विमानांना लाईव्ह बघू शकता. याशिवाय तुम्ही त्या फ्लाईटची सगळी माहिती देखील मिळवू शकता. जर तुमच्या फ्लाईटच्या वेळेमध्ये काही बदल झाला तर याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. याशिवाय तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रांचा विमान प्रवाससुद्धा ट्रॅक करू शकता. तुम्ही एअरपोर्ट किंवा लोकेशनला 'माय लिस्ट' मध्ये जोडू शकता. तुमच्या आजूबाजूला असलेला विमानांचा किंवा एअरपोर्टचा शोध घेऊ शकता.
Flighty
Flighty हे एक असं ॲप आहे ज्याच्यामार्फत तुम्ही विमानांविषयी सगळी माहिती मिळवू शकतात. जसे की -
25 तासाअगोदर तुम्ही जाणू शकता की तुमचा विमान कुठे आहे. तुमच्या खास लोकांना तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे प्रवास करत आहात याबद्दल माहिती देऊ शकतात. अर्थात तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या कुटुंबाला तुमच्या विमानाच्या ट्रॅकची लिंक शेअर करू शकतात आणि अगदी सहजरीत्या तुम्ही कुठे पोहोचला याबद्दल ते माहिती मिळवू शकतात. जर तुमचे विमान लेट होणार असेल तर याबद्दलची माहिती हा ॲप तुम्हाला अगोदरच देतो.आणि तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये चेंज देखील करू शकतात.
Google's Flight tracker
खरं तर या विमानाविषयी माहिती जाणून घ्यायला तुम्हाला वेगवेगळे ॲप डाऊनलोड करण्याची किंवा वेबसाईट शोधण्याची काही गरज नाही. सरळ गुगलवर जाऊन तुम्ही फ्लॅटचा नंबर टाका, यानंतर अगदी काही सेकंदात तुम्हाला तुमच्या फ्लाइटबद्दल सगळ्या डिटेल्स मिळू शकतात. google तुम्हाला स्वतःहून अनेक फ्लाईट ट्रॅकरची माहिती देतो.
इतर महत्वाची बातमी-