एक्स्प्लोर
कोसळलेल्या वाहबला युवराजचा हात, पाकिस्तानी चाहतेही फिदा!
लंडन : पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना इतर सामन्यांच्या तुलनेत वेगळा असतो. या सामन्यात उभय संघाचे खेळाडू मोठ्या जबाबदारीने मैदानात खेळण्यासाठी उतरतात. खेळताना मैदानात अनेकदा खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्याही घटना घडतात.
मात्र काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सामन्यात वेगळाच प्रसंग अनुभवायला मिळाला. पाकिस्तानचा गोलंदाज वाहब रियाज गोलंदाजी करत असताना स्ट्रेच आल्याने अचानक कोसळला. त्यावेळी स्ट्राईकवर असलेल्या युवराज सिंहने जवळ जाऊन त्याची विचारपूस करुन त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/lKR1088/status/871376568429363200
भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात अनेकदा खेळाडूंमधील खुन्नस दिसून येते. मात्र असे प्रसंग क्वचितच घडतात. या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक ठोकून सामनावीराचा मानकरी ठरलेल्या युवराजने पाकिस्तानी चाहत्यांचीही मनं जिंकली.
भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानचा अख्खा संघ केवळ 164 धावांवर गुंडाळून भारताने 124 धावांनी विजय साजरा केला. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने विजयी सलामी दिली आहे.
संबंधित बातमी : पाकिस्तानची शरणागती! महामुकाबल्यात भारताचा 124 धावांनी विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement