युवराज सिंहने जाहीर केली All Time Best XI; पाकिस्तानचा दिग्गज संघात, मात्र MS धोनीला स्थान नाही!
Yuvraj Singh All Time Best XI: युवराजने सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रूपाने आपल्या अकरामध्ये तीन भारतीयांची निवड केली.
Yuvraj Singh All Time Best XI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नेतृत्वाखाली भारत चॅम्पियन्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात असे अनेक दिग्गज उपस्थित होते. या स्पर्धेदरम्यान युवराज सिंगने सर्वोत्तम अकरा खेळाडूंची निवड केली, ज्यामध्ये त्याने एमएस धोनीचा समावेश केला नाही.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 दरम्यान बोलत असताना, युवराज सिंगने त्याच्या सर्वोत्तम इलेव्हनचा खुलासा केला. या अकरामध्ये युवराजने धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टचा समावेश केला आहे. याशिवाय त्याचा सर्वात मोठा शत्रू अँड्र्यू फ्लिंटॉफचाही बेस्ट इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2007 च्या T20 विश्वचषकादरम्यान इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराज सिंग यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादानंतर युवीने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकत विश्वविक्रम केला होता.
स्वत: 12 वा खेळाडू-
युवराजने बेस्ट इलेव्हन संघात स्वत:चाही समावेश केला नाही. त्यानंतर जेव्हा त्याला विचारण्यात आले की तुमच्या संघातील 12वा खेळाडू कोण असेल? यावर युवराजने स्वत:चे नाव घेतले. या भारतीय खेळाडूंचा समावेश होता.
रोहित, विराटची निवड-
युवराजने सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रूपाने आपल्या अकरामध्ये तीन भारतीयांची निवड केली. मात्र, युवीने एकाही भारतीय गोलंदाजाचा आपल्या संघात समावेश केला नाही. त्याने सचिन तेंडुलकरला सलामीवीर म्हणून ठेवले. याशिवाय तिसऱ्या क्रमांकासाठी रोहित शर्मा आणि चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहलीची निवड करण्यात आली. गोलंदाजांमध्ये त्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकमरचीही निवड केली, जो या अकरामध्ये एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे.
युवराज सिंगचा ऑल टाइम बेस्ट इलेव्हन
सचिन तेंडुलकर (भारत), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), रोहित शर्मा (भारत), विराट कोहली (भारत), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), शेन वॉर्न (शेन वॉर्न), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) ), ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), वसीम अक्रम (पाकिस्तान), अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड).
युवराज सिंगच्या टीमनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस (World Champions of Legends) ही स्पर्धा 3 जुलै ते 13 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. क्रिकेट विश्वातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम फेरीची लढत पार पडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या खेळाडूंचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारत आणि पाकिस्तान (IND-c vs PAK-C)यांच्यातील अंतिम फेरीची मॅच रोमहर्षक झाली. भारतानं पाकिस्तानला पाच विकेटनं पराभूत करत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 156 धावा केल्या होत्या. भारतानं हे आव्हान 5 बॉल बाकी ठेवत पूर्ण केलं.