एक्स्प्लोर

दमदार, शानदार! भारताने पाकिस्तानला लोळवलं, WCL च्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय

India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. हा अंतिम सामना चांगलाच रोमहर्षक झाला.

India vs Pakistan, World Championship of Legends final : वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला नमवलंय. या सामन्यात भारताने पाकिस्तानी संघावर पाच गडी राखून मात केली आहे. शनिवारी बर्मिंघम येथे हा सामना झाला. भारताने नुकतंच टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आळा. त्यानंतर आता वर्ल्ट चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्टस 2024 स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला नमवत विजयी कामगिरी करून दाखवली आहे. 

पाकिस्तानच्या 156 धावा, अंबातीचे दमदा अर्धशकत 

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंट्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकांत 156 धावा केल्या. तर भारतीय संघाने विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत पाच गडी राखून धावांचे हे लक्ष्य गाठले. भारताकडून अंबाती रायुडूने जोरदार खेळी करत 50 धावा केल्या. अंबातीच्या या खेळीमुळेच भारताला विजयापर्यंत जाणं सोपं झालं.

भारताची दमदार सुरुवात (India Champions vs Pakistan Champions Final)

विजयासाठी लागणाऱ्या धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली रॉबीन उथप्पा आणि अंबाती रायुडू सलामीला आले. अंबाती रायुडूने 30 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकार लगावत 50 धावा केल्या. तर उथप्पाला 10 धावाच करता आल्या. गुरकीरत सिंहनेही 33 चेंडूंत 34 धावा केल्या. यात युसूफ पठाणने 16 चेंडूंमध्ये 30 धावा करून भारताचा विजय सुकर केला. आपल्या या खेळात त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. कर्णधार युवराज सिंगला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 22 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. तर पाकिस्तानी संघाच्या आमीरने दोन बळी घेतले. अजमल, रियाज आणि शोएब यांनी प्रत्येक एक बळी घेतला.

भारताच्या अनुरित सिंहकडून तीन बळी

दुसरीकडे फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमवून पाकिस्तानने 156 धावा केल्या. या संघाकडून शोएब मलिकने सर्वाधिक 41 धावा केल्या. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. या संघाचा सलामीवीर शरजील खान 10 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा करून बाद झाला. मकसूदने 12 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या. कामरान अकमलने 19 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. तर कर्णधार युनिस खानला 11 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा करता आल्या.  गोलंदाजी विभागात भारतीय संघाकडून अनुरित सिंहने तीन बळी घेतले. 

हेही वाचा :

यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात

IND vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्यात बदल, बीसीआयकडून मोठी अपडेट,जाणून घ्या नवं वेळापत्रक 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget