Wrestler Vikram Parkhi Death : कुमार महाराष्ट्र केसरीची गदा, अंगाला हळद लावण्याची तयारी, तितक्यात हृदयविकारने गाठलं, विक्रमच्या जाण्याने मुळशी हळहळली!
Wrestler Vikram Parkhi Death : कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय.
Wrestler Vikram Parkhi Death : कुस्तीच्या आखड्यात शड्डू ठोकणार, मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारा पैलवान विक्रम पारखी थोड्याच दिवसाच लगीन गाठ बांधणार होता. अंगाला हळद लागण्याची तारीखही ठरली होती. मात्र, नियतीला हे मान्य नव्हतं. कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा विक्रम बुधवारी (दि.12) नेहमी प्रमाणे व्यायामाला गेला. पण त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला, यातच त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे अंगाला हळद लावण्याची तयारी सुरु असतानाच विक्रमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. विक्रमच्या जाण्याने कुस्तीक्षेत्रासह मुळशीवर शोककळा पसरलीये.
12 डिसेंबर रोजी होणार होता विक्रमचा विवाह
ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर काही क्षणात विक्रमने अखेरचा श्वास घेतलाय. विक्रम मुळशीतील माण या गावचा कुस्ती क्षेत्रात मेहनत आणि कसरत घेत नाव कमावलेल्या पैलवानाने वयाच्या तिशीतचं जगाचा निरोप घेतलाय. विक्रमचा 12 डिसेंबर विवाह होणार होता, मात्र संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच तो आयुष्याच्या आखाड्यातचं चितपट झालाय.
विक्रम विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरीसह अनेक पदक पटकावली
विक्रमने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शड्डू ठोकत अनेक किताब पटकावले होते. पुढं ही अनेक आखाडे गाजविण्याची क्षमता विक्रममध्ये होती, मात्र नियतीला काही हे मान्य नव्हतं. अनेक पैलवानांना चितपट करणाऱ्या विक्रमला हृदयविकाराच्या झटक्याने गाठले अन् यातच त्याचा मृत्यू झालाय. . त्याच्या अचानक जाण्याने सर्व मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते
मुळशीचा भूमिपुत्र असलेल्या पैलवान विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवण्याचा पराक्रम केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारे 2014 साली वारजे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. या शिवाय विक्रमने अनेक राष्ट्रीय पदके आणि किताब पटकावले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे आणि विक्रम पारखीचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 199 च्या कारगिल युद्धात लढा दिला होता. लष्करात राहून वडिलांनी देशाची सेवा केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या