एक्स्प्लोर

World Cup 2023 Records: फलंदाजांची बल्ले बल्ले, गोलंदाजांची पिटाई, यंदाच्या विश्वचषकात रेकॉर्ड्सची झडी

ICC World Cup 2023 Records : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात नवनवीन विक्रम रचले जात आहेत. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 सामने झाले आहेत.

ODI World Cup 2023 Records : सध्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 सामने झाले आहेत. आतापर्यंत विश्वचषक फलंदाजांसाठी अतिशय उत्तम ठरत आहे पण गोलंदाजांची काहीशी निराशा झाली आहे. याचं कारण म्हणजे आतापर्यंत फलंदाजांनी सर्वाधिक विक्रम रचले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अनेक नवे विक्रम रचले गेले. पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा 345 धावांचं आव्हन पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानने विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा विजय नोंदवला. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने सलग सात वेळा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. या सामन्यात एकूण चार शतके झळकावली गेली. ही विश्वचषकातील एका सामन्यातील सर्वाधिक शतकं आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत अनेक मोठे विक्रमही केले आहेत. जाणून घेऊया विश्वचषकात आतापर्यंत केलेले खास विक्रम.

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक

  • 49 चेंडू- एडन मार्कराम विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023*
  • 50 चेंडू- केविन ओब्रायन विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू, 2011
  • 51 चेंडू- ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका, सिडनी, 2015
  • 52 चेंडू- एबी डिव्हिलियर्स विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी 2015

आयसीसी वनडे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज

  • 2785 धावा - विराट कोहली (64 डाव)
  • 2719 धावा- सचिन तेंडुलकर (58 डाव)
  • 2422 धावा - रोहित शर्मा (64 डाव)
  • 1707 धावा - युवराज सिंग (62 डाव)
  • 1671 धावा - सौरव गांगुली (32 डाव)

विश्वचषकातील सर्वात जलद 1000 धावा

  • 19 डाव- डेव्हिड वॉर्नर/रोहित शर्मा
  • 20 डाव - सचिन तेंडुलकर/ एबी डिव्हिलियर्स
  • 21 डाव - विव्ह रिचर्ड्स/सौरव गांगुली
  • 22 डाव - मार्क वॉ/हर्शेल गिब्स

वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी चेंडूत 50 विकेट्स

  • 941 चेंडू - मिचेल स्टार्क
  • 1187 चेंडू - लसिथ मलिंगा
  • 1540 चेंडू - ग्लेन मॅकग्रा
  • 1562 चेंडू - मुथय्या मुरलीधरन
  • 1748 चेंडू - वसीम अक्रम.

वनडेतील सर्वात कमी डावात 6 शतके

  • डेव्हिड मलान - 23 डाव
  • इमाम-उल-हक - 27 डाव
  • उपुल थरंगा - 29 डाव
  • बाबर आझम - 32 डाव
  • हाशिम आमला - 34  डाव.

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा पाठलाग

  • 345 धावा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद, 2023*
  • 328 धावा आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू, 2011
  • 322 धावा बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, टॉंटन, 2019
  • 319 धावा बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, नेल्सन, 2015
  • 313 धावा श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, न्यू प्लायमाउथ, 1992.

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग विजय

  • 8 वेळा - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
  • 7 वेळा - भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 6 वेळा - वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे.

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या

  • 428/5 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली 2023*
  • 417/6 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 2015
  • 413/5 - भारत विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन 2007
  • 411/4 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड, कॅनबेरा 2015
  • 408/5 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, 2015.

एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सर्वाधिक धावा (दोन्ही डाव मिळून)

  • 754 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली 2023*
  • 714 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉटिंगहॅम 2019
  • 688 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी 2015
  • 682 धावा - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, नॉटिंगहॅम 2019
  • 676 धावा - भारत विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू 2011.

विश्वचषक सामन्यात सर्वाधिक चौकार

  • 105 चौकार- दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023
  • 93 चौकार - वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, 2015
  • 89 चौकार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बॅसेटेरे, 2007
  • 84 चौकार - श्रीलंका विरुद्ध केनिया, कँडी, 1996.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
Embed widget