Shubman Gill : भारतीय संघात दहा हत्तींचं बळ, डेंग्यूला हरवल्यानंतर गिलचे कमबॅक
WOrld Cup 2023 : ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन सामन्यात गिल उपलब्ध नव्हता. त्याची कमी टीम इंडियाला जाणवली होती. पण आता गिल परतल्यामुळे टीम इंडियाला दहा हत्तीचे बळ आले आहे.
Shubman Gill : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात प्रिन्स शुभमन गिल याचे कमबॅक झाले आहे. किंग विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत आता प्रिन्स गिलही मैदानात उतरणार आहे. शुभमन गिल याचे कमबॅक झाल्यामुळे भारतीय संघाची (Team India) ताकद आणखी वाढली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) याने मागील वर्षभरात भारतासाठी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. वर्षभरात गिल याने 1200 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. गिल याने डेंग्यूवर मात केल्यानंतर कमबॅक केले आहे. शुभमन गिल याचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. शुभमन गिल डेंग्यूमुळे पहिल्या दोन्ही सामन्याला मुकला होता. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन सामन्यात गिल उपलब्ध नव्हता. त्याची कमी टीम इंडियाला जाणवली होती. पण आता गिल परतल्यामुळे टीम इंडियाला दहा हत्तीचे बळ आले आहे.
आता गिलच्या कमबॅकमुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. मागील वर्षभराची आकडेवारी पाहिल्यास शुभमन हा टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. गिलने आतापर्यंत खेळलेल्या 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1917 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. गिलचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम स्कोअर 208 धावा आहे. शुभमन गिल याला अहमदाबादमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. गिल आयपीएलमध्ये गुजरात संघाचा सदस्य आहे. त्याने आयपीएलच्या दोन हंगामात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. अहमदाबादच्या मैदानाचा गिल याला अनुभव आहे.
SHUBMAN GILL IS BACK...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
He's making his World Cup debut against Pakistan today. pic.twitter.com/mHJPGKAJzq
मागील वर्षभरात गिल तुफान फॉर्मात
शभुमन गिलने सप्टेंबर महिन्यात दोन शतक ठोकली होती. आशिया चषकात बांगलादेशविरोधात शुभमन गिल याने शतकी खेळी केली होती. त्याशिवाय मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात शतक झळकावले होते. गिल याने यादरम्यान तीन अर्धशतकेही झळकावली आहे. आठ डावात शुभमन गिल फक्त दोन वेळा 50 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे.
वनडेमध्ये शुभमनच्या फलंदाजाची सरासरी 65+
शुभमन गिल भारताचा टॉप क्लास फलंदाज आहे. 24 वर्षीय शुभमन गिल याने वर्षभरात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने अवघ्या 35 डावांता 66.1 च्या सरासरीने 1917 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 102.84 इतका आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. शुभमन गिल डेंग्यूमुळे विश्वचषकाच्या पिहिल्या दोन्ही सामन्याला मुकला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात गिल मैदानात दिसला नव्हता. आता डेंग्यूचा सामना केल्यानंतर तो मैदानात परतला आहे.