Virat Kohli : संपूर्ण विश्वचषकात एकहाती झुंजला, पण किंग कोहलीचा लढा व्यर्थ! सेमीफायनलमधून टीम इंडिया बाहेर
IND vs ENG : टी20 विश्वचषक स्पर्धेच्य सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत होत स्पर्धेबाहेर जावं लागलं आहे. ज्यामुळे संपूर्ण विश्वचषक विराट कोहलीनं दिलेली झुंज व्यर्थ गेली आहे.
Virat Kohli in T20 World Cup 2022 : क्रिकेट जगताचा अनभिषिक्त राजा किंग कोहली अर्थात विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करताना दिसून आला. भारतीय संघाने खेळलेल्या 6 सामन्यातील 4 सामन्यात कोहलीने अर्धशतकं झळकावली. आज सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत होऊन भारताला स्पर्धेबाहेर जावं लागलं असलं तरी या सामन्यातही विराटने अर्धशतक झळकावलं. त्यामुळे 6 सामन्यात कोहलीने 4 अर्धशतकं झळकावत एकूण 296 रन केले. पण कोहलीच्या या तुफान खेळीनंतरही सेमीफायनलमध्ये गोलंदाजांनी भ्रनिरास केला आणि भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं.
कोहली आणि यंदाच्या वर्ल्ड कपचा विचार केला तर सर्वात पहिल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात अगदी चुरशीची लढत पाहायला मिळाली. भारताला विजयासाठी 160 धावा करायच्या होत्या, पण 31 धावांवर 4 विकेट गमावल्यानंतर कोहली आणि हार्दिक पंड्याने शानदार भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. विराटने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या होत्या. त्यानंतर नेदरलँडविरुद्धही विराटनं नाबाद 62 धावा केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो स्वस्तात बाद झाला आणि भारतानं सामना गमावला होता. ज्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही विराटनं फलंदाजीची धुरा सांभाळत नाबाद 64 धावांची खेळी केली. मग झिम्बाब्वेविरुद्ध कोहली 26 धावा करुन बाद झाला. पण आजच्या इंग्लंडविरुद्धच्या 'करो या मरो'च्या सामन्यात कोहलीने 40 चेंडूत 50 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. अखेर भारत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला असला तरी कोहलीनं दिलेली झुंज नक्कीच वाखणण्याजोगी होती.
फॅन्स कमालीचे नाराज
मागील काही वर्षे खराब फॉर्मात असलेल्या कोहलीने आशिया कप 2022 मध्ये फॉर्मात पुन्हा परतत शतक झळकावलं. पण त्यानंतर विश्वचषकात मात्र कोहलीने अगदीच धमाकेदार खेळ दाखवला. 6 सामन्यात त्याने 296 धावा कुटल्या, पण तरीही भारत विश्वचषक न जिंकू शकल्याने सोशल मीडियावर कोहली फॅन्स आणि भारतीय चाहते नाराज झाले असून अनेक इमोशनल मीम शेअर करत आहेत.
#INDvsENG
— Akshat (@AkshatOM10) November 10, 2022
Being Virat Kohli and his fan isn't a easy task.
how it started how it ended pic.twitter.com/2k7OzVfycX
Virat kohli in T20i Wc 319 runs in 2014, 273 runs in 2016 and 296 runs in 2022. Deserve a Trophy 🥲#INDvsENG pic.twitter.com/VcsgZG7Enu
— V I P E R™ (@VIPERoffl) November 10, 2022
Virat kohli top scorer in last 3 t20 wrold cups
— M. (@IconicKohIi) November 10, 2022
This guy deserves a trophy for carrying this indian team 💔😞 pic.twitter.com/1WwH8fAqXe
Heartbreaking to see this picture - Virat Kohli and Hardik Pandya in this Semifinal.💔 pic.twitter.com/KUYyy0Arpd
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 10, 2022
These pictures will always hurt. But Virat Kohli are Champion, you're true Superstar. pic.twitter.com/oVHlEQrXVy
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 10, 2022
हे देखील वाचा-