(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli: जयवर्धनेच्या डोक्यावरचा ताज हिसकावण्यासाठी विराट सज्ज; 89 धावा करताच बनणार टी-20 चा 'किंग'
T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीचं पुन्हा एकदा आक्रमक रुप पाहायला मिळालं. या सामन्यात विराटनं अवघ्या 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, विराट टी-20 विश्वचषकातील विश्वविक्रम मोडण्यापासून अवघ्या 89 धावा दूर आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महिला जयवर्धनेनं (Mahela Jayawardene) एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर, विराट कोहलीच्या नावावर सध्या 927 धावांची नोंद आहे. महिला जयवर्धने यांच्या डोक्यावरचा ताज हिसकावून घेण्यासाठी विराट सज्ज झालाय.
जयवर्धनेनं टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं टी- 20 विश्वचषकातील 31 डावात 965 धावा केल्या आहेत. तर, 927 धावांसह विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं टी-20 विश्वचषकाच्या अवघ्या 20 डावात इतक्या धावा केल्या आहेत. विराट कोहली सध्या महेला जयवर्धनेपेक्षा 89 धावांनी आणि ख्रिस गेलपेक्षा 38 धावांनी मागं आहे.
नेदरलँड्सविरुद्ध विराट इतिहास रचण्याची शक्यता
विराटनं नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 1000 धावांचा टप्पा ओलांडला तर तो टी-20 विश्वचषकात सर्वात कमी डावात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरेल. टी-20 विश्वचषकात विराट कोहलीचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. विराटनं 131.48 च्या स्ट्राईक रेट आणि 84.27 च्या सरासरीनं 927 धावा केल्या आहेत.
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय-
क्रमांक | नाव | धावा |
1 | विराट कोहली | 927 |
2 | रोहित शर्मा | 851 |
3 | युवराज सिंह | 593 |
4 | महेंद्रसिंह धोनी | 529 |
हे देखील वाचा-