Virat Kohli : पुणेकरांचे पैसे फिटले! बँटिंगआधी विराट बॉलिंगसाठी मैदानात; एकदिवसीय सामन्यात 6 वर्षांनंतर गोलंदाजी
Virat Kohli Bowling : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पांड्याला दुखापत झाल्यानंतर कोहलीनं बॉलिंग केली.
IND vs BAN, World Cup 2023 : विश्वचषकात 2023 (ODI World Cup 2023) भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यात स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ची गोलंदाजी (Bowling) पाहायला मिळाली. सामन्यात कोहलीच्या फलंदाजीआधी चाहत्यांना त्याची गोलंदाजी (Virat Kohli Bowling) पाहायला मिळाली. बांगलादेश विरुद्धच्या सामन्या हार्दिक पांड्याला दुखापत झाली, यामुळे तो मैदानाबाहेर गेला. यावेळी विराट कोहलीने गोलंदाजी केली. यामुळे चाहत्यांना अनेक वर्षांनंतर कोहलीची गोलंदाजी पाहता आली. यंदा विश्वचषक भारतात होत असल्याने आधीच चाहत्यांमद्ये प्रचंड उत्साह आहे. त्यातच पुण्यातील सामन्यादरम्यान 'किंग कोहली'ची गोलंदाजी पाहायला मिळाल्याने चाहतेही उत्साहात होते.
विश्वचषकात कोहलीची गोलंदाजी
बांगलादेशने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान फलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. चेंडू अडवताना पांड्याला दुखापत झाली. यावेळी पांड्याला वेदना होत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर मैदानावर डॉक्टर आले, त्याला तपासलं. यानंतर पांड्याने पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदना होत असल्याने त्याला षटकं पूर्ण करता आलं नाही. यानंतर कोहलीनं गोलंदाजी केली. विराटने पांड्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू टाकले.
Virat Kohli bowling in ODIs for the first time in 6 years. pic.twitter.com/nEJ9R4Ehsa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
6 वर्षानंतर ODI मध्ये गोलंदाजी
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात नवव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पांड्याला दुखापत झाली. त्यानंतर कोहलीने उरलेले तीन चेंडू टाकले. कोहलीच्या गोलंदाजीवर लिटन दास आणि तांझीद हसन यांना तीन चेंडूत फक्त दोनच धावा करता आल्या. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यामध्ये सहा वर्षांनंतर गोलंदाजी केली.
The bowling career of King Kohli. pic.twitter.com/2YvWbcGQnD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी मैदानावर येत हार्दिक पांड्यावर उपचार केले. पण हार्दिकला आराम मिळाला नाही. तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला, पण दुखापत बळावली. त्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान साडून परत तंबूत जावे लागले.
Hardik Pandya going off...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
- Hoping he is alright soon. pic.twitter.com/OaD2E8dz2Q
महत्वाच्या इतर बातम्या :