एक्स्प्लोर

World Cup 2023 : यंदाचा विश्वचषक 'हा' कर्णधार जिंकणार, ज्योतिषाची भविष्यवाणी; याआधीच्या तीन विश्वचषकाचं परफेक्ट भाकीत

World Cup Astrology Prediction : सध्या विश्वचषकात (ODI World Cup 2023) सामील संघांपैकी दोन संघांचे कर्णधार 1987 मध्ये जन्मले आहेत.

Astrology Prediction : सध्या भारतात विश्वचषकाचा (World Cup 2023) थरार सुरु आहे. 5 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेकडे जगाच्या नजरा लागल्या आहे. यंदाचा विश्वचषक (ICC World Cup 2023) भारतात (India) होत असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विश्वचषक 2023 मध्ये दहा संघांमध्ये लढता पाहायला मिळत आहे. या विश्वचषकाचा विजेता कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 19 नोव्हेबरला क्रिकेट विश्वविजेता मिळणार आहे. पण, त्याआधीच विश्वचषक 2023 च्या विजेत्या संघाबाबत एका ज्योतिषानं (Astrologer) मोठी भविष्यवाणी केली आहे. 

कोण होणार विश्वविजेता?

ज्योतिषी शास्त्रज्ञाने (Astrology) वर्ल्ड कप 2023 (ODI World Cup 2023) च्या विजेत्याबाबत केलेली भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय आहे. '1987 मध्ये जन्मलेला कर्णधार विजयी होणार', अशी भविष्यवाणी या ज्योतिषीनं केली आहे. वैज्ञानिक ज्योतिषी (Scientific Astrologer) ग्रीनस्टोन लोबो (Greenstone Lobo) यांनी विश्वचषक (World Cup 2023 Winner) विजेत्याबाबत भाकीत (Prediction) केलं आहे. यांची ही भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. सोशल मीडिया (Social Media) वरही यासंदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.

विश्चचषकाबाबत ज्योतिषाची भविष्यवाणी!

वैज्ञानिक ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो (Greenstone Lobo) यांनी भविष्यवाणी करत म्हटलं आहे की, 1987 मध्ये जन्मलेला कर्णधार (Captain Born in The Year 1987) भारतात होणारा पुरुष एकदिवसीय विश्वचषक (Men's ODI World Cup in India) जिंकेल. 1986 मध्ये जन्मलेले खेळाडू आणि कर्णधारांपेक्षा 1987 मध्ये जन्मलेल्या खेळाडूंकडून अलीकडच्या काळातील मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळालं आहे, असं त्यांनी नमूद केलं. यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ग्रीनस्टोन लोबो यांनी 2011, 2015 आणि 2019 क्रिकेट विश्वचषक विजेत्या (Cricket World Cup) संघांबाबतही भाकीत केलं होतं, जे अचूक ठरलं होतं.

याआधीच्या तीन विश्वचषकाचं परफेक्ट भाकीत

एका व्हिडीओमध्ये, वैज्ञानिक ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी विजेत्या संघाबद्दल भाकीत करत सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, टेनिस सुपरस्टार नोव्हाक जोकोविच, ज्याने राफेल नदालला मागे टाकले, त्याचा जन्म 1987 मध्ये झाला, तर नदालचा जन्म 1986 मध्ये झाला. 2022 मध्ये नुकताच झालेला फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली जिंकला. मेस्सीचा जन्म 1987 मध्ये झाला. 2018 फिफा विश्वचषक फ्रान्सने जिंकला, तेव्हा ह्यूगो लोरिस कर्णधार होता, त्याचा जन्म 1986 मध्ये झाला. क्रिकेटकडे लक्ष वळवताना, लोबो यांनी निदर्शनास आणत सांगितलं की, 2019 मध्ये इंग्लंडने विश्वचषक जिंकला तेव्हा 1986 मध्ये जन्मलेला इयॉन मॉर्गन हा कर्णधार होता. 

यंदाचा विश्वचषक 'हा' कर्णधार जिंकणार? 

सध्या विश्वचषकात सामील संघांपैकी दोन संघांचे कर्णधार 1987 मध्ये जन्मले आहेत. ग्रीनस्टोन लोबो यांनी पुढे सांगितलं की, ''बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनचा जन्म 1987 मध्ये झाला आहे, पण बांगलादेश संघाची स्थिती तशी चांगली नाही. त्याशिवाय 1987 मध्ये जन्मलेला दुसरा कर्णधार म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा. तो विश्वचषक जिंकेल.'' असा दावा लोबो यांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थितRajkiya Shole on Saif Ali khan | हायटेक सुरक्षा असतानाही हल्लेखोर सैफच्या घरात शिरलाच कसा?Zero Hour on Nashik | महापालिकेचे महामुद्दे: नाशिक शहराचे उद्यानं धुळ खात पडलीतZero Hour on Dhule| धुळे पालिकेच्या कामाचा क्रमच उलटा, आधी रस्ते केले मग पुन्हा गटारांसाठी  खोदले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget