एक्स्प्लोर

Tsunami Alert : जपानच्या फुकुशिमा अणुप्रकल्प मोकळा केला, रशियातील भूकंपानंतर 12 देशांवर पुन्हा त्सुनामीचे संकट

Tsunami In Pacific Ocean : त्सुनामीचा धोका हा चीनलाही देण्यात आला असून शांघायमध्ये 2.8 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Russia Earthquake News : रशियाच्या कामचाटका भागात 30 जुलै रोजी सकाळी 8.8 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाल्यानंतर संपूर्ण प्रशांत महासागर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वाढला असून 12 हून अधिक देशांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभमीवर जपानने फुकुशिमा अणुप्रकल्प तातडीने रिकामा केला आहे. या भागात 60 सेमीपासून 15 फूट उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळताना दिसल्या. जपानला 2011 च्या भयानक त्सुनामीचा अनुभव असल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क आहे.

या आधी जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुप्रकल्पाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे जपानने खबरदारी म्हणून हा अणुप्रकल्प रिकामा केला आहे. 

जगभरात त्सुनामीचा धोका: कोणत्या देशांवर परिणाम?

रशिया, जपान, अमेरिका (कॅलिफोर्निया, अलास्का), हवाई, फिलीपिन्स, गुआम, इक्वाडोर, पेरू, चिली, सोलोमन आयलंड्स, नॉर्दर्न मारियाना, न्यूजीलंड

हवाई बेटांच्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, एअरपोर्टही बंद करण्यात आला आहे. चीनमधील शांघायमध्ये 2.8 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे अद्याप त्सुनामीची लाट नोंदवली गेलेली नाही, पण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धोका किती काळ टिकू शकतो?

Pacific Tsunami Warning Center (PTWC) आणि जपान हवामान एजन्सी (JMA) च्या मते, पुढील 12 ते 30 तास त्सुनामीचा धोका राहू शकतो. त्सुनामी केवळ उंच लाटांमुळेच नव्हे तर त्यांच्या वेग आणि ताकदीमुळेही मोठे नुकसान घडवते.

Tsunami In Pacific Ocean : त्सुनामी किती घातक असते?

- 15 सेमी लाट माणसाला खाली पाडू शकते.

- 60 सेमी लाट गाड्या, दुचाकी वाहून नेऊ शकते.

- 90 सेमी लाट झाडं, वीज खांब, कुंपण कोसळवू शकते.

- त्सुनामीच्या लाटा 700–800 किमी/तास वेगाने किनाऱ्यावर धडकू शकतात.

Tsunami Alert In India : भारताला किती धोका?

सध्या भारतात थेट धोका नसला तरी प्रशांत महासागरातील अस्थिरता लक्षात घेता समुद्रकिनारी असलेल्या देशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जपानपासून ते हवाईपर्यंत 12 देशांमध्ये त्सुनामीमुळे उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता आणि त्सुनामीचा प्रचंड वेग पाहता, प्रशासन आणि नागरिकांनी वेळेत योग्य पावले उचलल्यासच जीवित आणि मालमत्तेची हानी टाळता येईल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Fire Cylinder blast: नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीचा भडका, दोन जण अडकले
नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीचा भडका, दोन जण अडकले
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Team India : दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Development : 'महाराष्ट्राला जगासोबत स्पर्धा करण्यास सक्षम बनवू' - मुख्यमंत्री Devendra Fadnavis
Thane Politics : 'आमच्याकडे Atom Bomb आहे, तो आम्ही फोडतो'; Jitendra Awhad यांचा सरकारला इशारा
Bachchu Kadu : 'आत्महत्या करण्यापेक्षा आमदारच काय, खुडालादेखील कापू', Hingoli तील शेतकऱ्यांचा Bachchu Kadu यांना पाठिंबा
Kadu's Controversial Remark: 'पूजा करायची का? वेळ आली तर मीच सोपतो', माजी आमदार Bachchu Kadu यांचा इशारा
Shaniwar Wada Row: 'खासदार Medha Kulkarni यांच्यावर गुन्हा दाखल करा', NCP च्या Rupali Thombre यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Fire Cylinder blast: नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीचा भडका, दोन जण अडकले
नवी मुंबईतील इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीचा भडका, दोन जण अडकले
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Diwali 2025 : आली दिवाळी, स्नेहमिलन कार्यक्रमात दे टाळी... छत्रपती संभाजीनगरचे राजकारणी एकाच फ्रेममध्ये, फोटो व्हायरल 
Team India : दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात दोन बदल होणार, गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूचं स्थान संकटात, गिल रणनीती बदलणार 
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
Gunaratna Sadavarte: लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि येणार, गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा 
गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढवणार, पुढच्या पाडव्यापर्यंत राजकारणात सक्रीय होणार, सदावर्तेंची मोठी घोषणा
Asrani Passesd Away: सोशल मिडीयावर दिवाळीच्या शुभेच्छा, ती पोस्ट ठरली अखेरची... काही तासांतच आली असरानी यांच्या निधनाची बातमी
सोशल मिडीयावर दिवाळीच्या शुभेच्छा, ती पोस्ट ठरली अखेरची... काही तासांतच आली असरानी यांच्या निधनाची बातमी
Navi Mumbai Fire: नवी मुंबईत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू
ऐन दिवाळीत आक्रित घडलं, कामोठ्यात भीषण आग, सगळे बाहेर पडले पण ते दोघेजण आतच अडकले अन्...
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत
Embed widget