एक्स्प्लोर
Kadu's Controversial Remark: 'पूजा करायची का? वेळ आली तर मीच सोपतो', माजी आमदार Bachchu Kadu यांचा इशारा
माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून कापूस आणि सोयाबीनच्या घसरलेल्या भावावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'आमदाराला मारा कापा बोलले तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग येत नाही का?', असा संतप्त सवाल माजी आमदार बच्चू कडू यांनी विचारला आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांना ९० टक्के हमीभाव मिळतो, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन तीन हजारांनी आणि कापूस सहा हजारांनी विकावा लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याला जबाबदार असणाऱ्यांना चोपायला पाहिजे, वेळ आली तर मी स्वतः हे काम करेन, असा थेट इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
पुणे
क्राईम
Advertisement
Advertisement
















