Asrani Passesd Away: सोशल मिडीयावर दिवाळीच्या शुभेच्छा, ती पोस्ट ठरली अखेरची... काही तासांतच आली असरानी यांच्या निधनाची बातमी
Veteran Actor Asrani Last Instagram Post: ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची 20 ऑक्टोबर रोजी शेअर केलेली ती स्टोरीच शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली.

मुंबई: एकीकडे देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, दुसरीकडे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी, ज्यांना प्रेक्षक ‘असरानी’ या नावाने ओळखतात, यांचे 84 व्या वर्षी निधन (Veteran Actor Asrani Passed Away) झाले. विशेष म्हणजे, निधनाच्या काही तास आधीच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली होती. 20 ऑक्टोबर रोजी शेअर केलेली (Veteran Actor Asrani Passed Away) ती स्टोरीच त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली. या ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनानंतर अवघ्या सिनेविश्वातील हळहळ व्यक्त केली जाते आहे. (Veteran Actor Asrani Passed Away)
असरानी यांचे 20 ऑक्टोबर रोजी, सोमवारी दुपारी चार वाजता मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात निधन झाले. दीर्घकाळ आजारपणानंतर त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली. त्यानंतर त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी सांताक्रूझमधील शास्त्री नगर स्मशानभूमीत कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीमुळे आणि विनोदी भूमिकांमुळे ते प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले. ‘शोले’मधील जेलरची भूमिका, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘शराबी’, ‘चोटे सरकार’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार असरानी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसांचा गंभीर त्रास होता आणि गेल्या चार दिवसांपासून जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर झालेली पोस्ट त्यांनी स्वतः न करता, त्यांच्या सोशल मीडिया टीमकडून शेअर करण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Asrani Passesd Away: असरानी यांचा परिचय
गोवर्धन असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी झाला होता. विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ते ओळखले जायचे. असरानी यांनी 1960 च्या दशकात चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटात आयकॉनिक भूमिका केल्या आहेत. ज्यामध्ये 'शोले', 'भूल भुलैया', 'धमाल', 'बंटी और बबली 2', 'ऑल द बेस्ट', 'वेलकम' यासारख्या प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या अनेक सिनेमांची नावे या यादीत आहेत.
गाजलेले चित्रपट : बावर्ची, नमक हराम, घर परिवार, कोशिश, परिचय, अभिमान, महबूबा, पलकों की छाँव में, दो लड़के दोनों कड़के, बंदिश, आज की ताज़ा ख़बर, रोटी, प्रेम नगर, चुपके चुपके, छोटी सी बात, रफू चक्कर, शोले, बालिका बधू, फकीरा, अनुरोध, छैला बाबू, चरस, दिल्लगी, हीरालाल पन्नालाल, आदी
Asrani Passesd Away: असरानी म्हणजे हुकमी मनोरंजन फडणवीसांची श्रद्धांजली
आपल्या कसदार अभिनयाने चित्रपट सृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणून ज्येष्ठ अभिनेते असरानी रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. 'असरानी' म्हणजे हुकमी मनोरंजन अशी ख्याती त्यांनी मिळवली, अशा हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन म्हणजे चित्रपट सृष्टीची मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
"विनोदी, ढंगदार आणि आशयघन विषयातही असरानी यांच्या भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ठरल्या. कसदार आणि रसरशीत अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळेच त्यांचा 'शोले' चित्रपटातील जेलर अजरामर ठरला. हिंदी चित्रपट सृष्टी, कला क्षेत्रासाठी असरानी यांनी दिलेले योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण असे राहीले आहे. यामुळेच त्यांना या क्षेत्रातील अनेक मानांकित पुरस्कार देखील मिळाले. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टी, त्यांचे निकटवर्तीय, चाहते तसेच कुटुंबियांवर आघात झाला आहे. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी असून, हा आघात सहन करण्याची त्यांना ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
























