एक्स्प्लोर

Video: मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच 'धडाकेबाज' वक्तव्य चर्चेत

दिवाळीचा उत्सव सर्वत्र साजरा होत असून आगामी निवडणुकांची किनार यंदाच्या दिवाळीला पाहायला मिळत आहेत.

मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असून मुंबईचा (Mumbai) महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा, यासाठी शिवसेना ठाकरे आणि भाजपा यांच्यात राजकीय युद्ध रंगलं आहे. भाजपने यंदा मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर, मुंबई महापालिका हातातून जाऊ न देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच, दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (mahesh kothare) केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, मुंबईचा महापौर भाजपचाच (BJP) होणार, मी मोदीभक्त आहे, असे वक्तव्य कोठारे यांनी एका कार्यक्रमात केले होते. महेश कोठारे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दिवाळीचा उत्सव सर्वत्र साजरा होत असून आगामी निवडणुकांची किनार यंदाच्या दिवाळीला पाहायला मिळत आहेत. मुंबईतील बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारे यांनी थेट आगामी मुंबईचा महापौर भाजपचा आणि इथलाच असेल, असे वक्तव्य केलं. तसेच, मोदीभक्त आहे, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, अशी राजकीय फटकेबाजी कोठारेंनी केलीय. 

महापौर भाजपचाच होईल

कोठारे यांनी लोकसभा निवडणुकांचा संदर्भही यावेळी दिली. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीयमंत्री म्हणून निवडून येत आहेत. आता जर या विभागातून येणारा नगरसेवक हा केवळ नगरसेवक नसेल तर भाजपने ठरवलं, नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचं तर मुंबईचा महापौर इथूनच निवडला जाईल, असेही महेश कोठारे यांनी म्हटलं. महेश कोठारेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता, राजकीय वर्तुळातून यावर काय प्रतिक्रिया येतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

एकनाथ शिंदेंचंही कौतुक, म्हणाले ते दणकेबाज

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’चं उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडलं. या उद्घाटन सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे आणि अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती होती. येथे भाषण करताना महेश कोठारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. “धडाकेबाज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांना खरोखरच रत्न दिलं आहे. या शहराला नाट्यकलेचं भव्य स्थान दिलंय, त्याबद्दल आम्ही सर्व कलाकार मनापासून खुश आहोत.” शिंदे साहेब जे काही करतात, ते धडाकेबाजच करतात, अशी उद्घाटन समारंभ मी याआधी कधीच पाहिली नव्हती, असेही कोठारे यांनी म्हटलं

हेही वाचा

ते दणकेबाज... महेश कोठारेंनी एकनाथ शिंदेंचं केलं तोंड भरून कौतुक, मग अशोक मामाही भरभरुन बोलले

 

 

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Yo Yo Honey Singhs nephew Death: हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
Embed widget