एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी

सातारा जिल्ह्यातील सातारा कास रोडवर रेसिंग कारच्या नादात दोन-चार गाड्यांचा भीषण अपघात झाला.

मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीचा (Diwali) उत्साह आणि आनंद साजरा होत असताना राज्यातील दोन जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सातारा (Satara) आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील पुसद येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. यातील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सातारा जिल्ह्यातील सातारा कास रोडवर रेसिंग कारच्या नादात दोन-चार गाड्यांचा भीषण अपघात झाला. येथील गणेश खिंड परिसरातील ही घटना असून 5 चार चाकी गाड्यांची रेस लागली होती. त्यामध्ये, एक चार चाकी गाडी पलटी झाल्याने इतरही गाड्या त्यास धडकल्याची घटना घडली. हुल्लडबाजी करताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. दिवाळीच्या दिवशी अतिउत्साही पर्यटकांची सातारा-कास रोडवर हुल्लडबाजी सुरू होती. त्यावेळी झालेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हुल्लडबाज पर्यटकांवर  पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

वाशिमध्ये दुचाकी अन् वाहनाची धडक

वाशिम जिल्ह्यातही दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. वाशिम ते पुसद मार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. जखमीला तात्काळ वाशिमच्या  जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याची चर्चा असून, दुचाकीला धडक देताच धडक देणारे वाहन अपघात स्थळावरून पसार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. 

हेही वाचा

प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Lt Col Satish Dhage : देशात 6 महिन्यांत 2 हल्ले,नेमकं कारण काय?
Zero Hour Atul Londhe : देशाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केल्यास वाईट वाटण्याचं कारण काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar : दिल्लीतील बॉम्बस्फोट सरकारचं अपयश, पण विरोधकांसारखं राजकारण करणार नाही
Zero Hour Delhi Terror Attack : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, कटामागे उच्चशिक्षित डॉक्टर्स?
Terror Doctor Network : स्फोटात डॉक्टरांचं कनेक्शन, Dr. Adil आणि Dr. Umar चं Anantnag कनेक्शन उघड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Embed widget