![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Team India Playing 11 : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोणाला संधी मिळणार? सेमीफायनलच्या सामन्यात कशी असणार भारताची प्लेईंग 11?
IND vs ENG : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून भारतासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. दरम्यान भारत नेमकं कोणत्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार हे पाहावं लागेल.
![Team India Playing 11 : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोणाला संधी मिळणार? सेमीफायनलच्या सामन्यात कशी असणार भारताची प्लेईंग 11? Team India Playing 11 for IND vs ENG Semifinal 2 in T20 world Cup 2022 Rishabh pant or dinesh karthik who will get chance Team India Playing 11 : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक कोणाला संधी मिळणार? सेमीफायनलच्या सामन्यात कशी असणार भारताची प्लेईंग 11?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/d28aec7c867b21e0fdcf67ed2a969d0d1668062967752323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs England, T20 : टीम इंडिया (Team India) आज सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे, फायनल गाठण्यासाठी आज भारताला इंग्लंड संघाला (India vs England) मात द्यावी लागणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट पाकिस्तानशी फायनलमध्ये दोन हात करेल. तर पराभूत संघाचं आव्हान इथेच संपणार आहे. भारतीय संघाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनल गाठली आहे. तर इंग्लंड संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचा एक सामना अनिर्णीत सुटला होता. ज्यामुळे दोन्ही संघ कमाल फॉर्मात आहेत, अशामध्ये भारताने सुरुवातीपासून आपल्या प्लेईंग 11 मध्ये अधिक बदल केलेले नाहीत. केवळ एका सामन्यात अक्षरला विश्रांती देत दीपक हुडाला संधी दिली होती. तर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला विश्रांती देऊन ऋषभ पंतला संधी दिली गेली होती. त्यानंतर आज संघात कोणते बदल होतील का अशी चर्चा असून मीडिया रिपोर्ट्समधून येणाऱ्या माहितीनुसार भारत झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरलेला संघच घेऊन आजही इंग्लंडचा सामना करणार आहे....
संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड संघाची प्लेईंग 11 कशी असेल?
इंग्लंड संघाचा विचार करता वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळं भारताविरुद्धच्या आजच्या करो या मरो च्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याऐवजी संघाचा स्टार ऑलराऊंडर क्रिस जॉर्डनला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. या स्पर्धेत मार्क वूडनं चांगली कामगिरी बजावलीय. यातच त्याचं संघाबाहेर होणं इंग्लंडच्या संघासाठी मोठा धक्का असेल. पण दुसरीक़डे ख्रिस जॉर्डनचा रेकॉर्ज भारताविरुद्ध कमाल आहे, तसंच त्याच्या संघात येण्याने इंग्लंडची फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे.
संभाव्य इंग्लंडचा संघ
अॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद
कधी, कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज अर्थात 10 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम (Adelaide Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचं थेट प्रक्षेपण होईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)