भारताविरुद्धचा लाजिरवाणा पराभव जिव्हारी, श्रीलंकन क्रीडामंत्र्यांचं टोकाचं पाऊल, अख्खा क्रिकेट बोर्ड बरखास्त!
Sri Lanka Cricket Board Sacked : श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे (Sri Lanka sports Minister Roshan Ranasinghe) यांनी टोकाचं पाऊल उचलत, अख्खा क्रिकेट बोर्ड बरखास्त (Sri Lanka Cricket Board) करण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी पराभव, त्यातच विश्वचषकातून बाहेर पडल्याने, श्रीलंकंन प्रशासनाने हे पाऊल उचललं.
कोलंबो : क्रिकेट विश्वचषकात (Cricket World Cup 2023) टीम इंडियाने केलेला पराभव श्रीलंकंन (India vs Sri Lanka) क्रीडामंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे (Sri Lanka sports Minister Roshan Ranasinghe) यांनी टोकाचं पाऊल उचलत, अख्खा क्रिकेट बोर्ड बरखास्त (Sri Lanka Cricket Board) करण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी पराभव, त्यातच विश्वचषकातून बाहेर पडल्याने, श्रीलंकंन प्रशासनाने हे पाऊल उचललं. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेंने विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात श्रीलंकेने केवळ 2 विजय मिळवले.
श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली आहेत. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारलाच, पण आता त्यापुढे जात थेट क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
क्रीडामंत्र्यांनी 'तलवार' उपसली
क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी शुक्रवारीच आपली तलवार उपसली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्ड हा देशद्रोही आणि भ्रष्ट आहे अशी जहरी टीका त्यांनी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी बोर्डाच्या सदस्यांकडे राजीनामे मागितले होते. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा जे दुसरे मोठे पदाधिकारी आहेत, त्यांनी राजीनामा दिला होता. क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ जाऊन निदर्शने केली होती.
अर्जुन रणतुंगाच्या हाती धुरा (Arjuna Ranatunga)
दरम्यान, क्रीड मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अन्य सदस्यांनाही बरखास्त करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी विश्वविजेता माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखालील एक अंतरिम समिती नियुक्त करण्यात आली आहे. या 7 सदस्यीय समितीमध्ये अर्जुन रणतुंगा यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील दोन निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश आहे.
भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय (India beat Sri Lanka)
दरम्यान, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Mumbai Wankhede stadium) सामना झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली.शुभमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यर 82 यांनी शानदार अर्धशतके ठोकली. श्रीलंकेकडून मधुशंका याने पाच विकेट घेतल्या.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजाचा दम निघाला. श्रीलंकेचा अख्खा संघ अवघ्या 55 धावात गारद झाला. त्यामुळे भारताने हा सामना 302 धावांनी जिंकला.
संबंधित बातम्या
IND vs SL ODI World Cup 2023: रोहितसेना सुस्साट... वानखेडेच्या मैदानावर श्रीलंकेची घरवापसी, 302 धावांनी भारताचा विजय
investment : श्रीलंकेनं जेवढ्या धावा केल्या फक्त तेवढेच पैसे जमा करा, करोडपती व्हा; असं करा नियोजन
Points Table : भारत गुणतालिकेत पुन्हा अव्वल, लंकेचं आव्हान संपलं, पाहा इतर संघाची स्थिती