(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Jadeja : भारतासाठी धोक्याची घंटा, दुखापतीमुळे जाडेजा विश्वचषकाला मुकण्याची शक्यता
Cricket News : दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजाच्या जागी आशिया कप 2022 स्पर्धेत अक्षर पटेल संघात सामील झाला आहे. पण आता जाडेजा टी20 विश्वचषकाला मुकण्याची बातमीही समोर येत आहे.
ICC T20 World Cup : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) ही स्पर्धा सध्या यूएईमध्ये (UAE) सुरु असून त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) पार पडणार आहे. दरम्यान नुकताच आशिया कप स्पर्धेत भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळं बाहेर गेल्याची माहिती समोर आली असताना आता तो विश्वचषकासाठीही संघात नसल्याचं वृत्त समोर येत आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो विश्वचषकाला मुकणार असल्याची माहिती प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने ट्वीट करत दिली आहे.
पीटीआयचं ट्वीट-
Senior India all-rounder Ravindra Jadeja set to miss T20 World Cup as he will undergo knee surgery
— Press Trust of India (@PTI_News) September 3, 2022
भारताला मोठा धक्का
आशिया चषकादरम्यान रवींद्र जाडेजाचं दुखापतग्रस्त होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र जाडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यात त्यानं भारतासाठी 35 धावांचं महत्वाचं योगदान दिलं होतं. तर, हाँगकाँगविरुद्ध त्यानं चार षटकात 15 धावा देऊन 1 विकेट्स घेतली होती. त्यानंतर आता तो विश्वचषकालाही मुकल्यास भारताला मोठं नुकसान होईल.
लवकरच टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय निवड समिती टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
आशिया कपमध्ये जाडेजाची जागा हुडाला द्या-जाफर
भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. अक्षरने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. पण दीपक हुडाला संघात संधी दिल्यास त्याच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने व्यक्त केला आहे. दरम्यान आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.
हे देखील वाचा-