(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma : 'हिटमॅन'ची ऐतिहासिक कामगिरी! विश्वचषकात 'हा' विक्रम करणारा पहिला कर्णधार, तरीही कोहलीच्या मागेच
IND vs ENG, World Cup 2023 : विश्वचषकात भारतीय संघाने रविवारी गतविजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला.
Rohit Sharma Record : एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC ODI World Cup 2023) सामन्यात टीम इंडिया (Team India) ने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. सलामीला उतरलेल्या कर्णधार रोहित शर्माने संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 101 चेंडूत 87 धावांची तुफान खेळी केली होती. यादरम्यान रोहित शर्माने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. सामन्याची या विजयी खेळीसाठी रोहित शर्माला 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of The Match) पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकून रोहित शर्मानं नवा विक्रम रचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दोन वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणार रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
'या' यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर
रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा दुसरा फलंदाज बनला आहे. या यादीत भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरला एकदिवसीय विश्वचषकात 9 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅकग्राने विश्वचषकादरम्यान सहा वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
Captain Rohit Sharma led from the front with a spectacular 87(101) as he receives the Player of the Match award 🏆#TeamIndia register a 100-run win over England in Lucknow 👏👏
— BCCI (@BCCI) October 29, 2023
Scorecard ▶️ https://t.co/etXYwuCQKP#CWC23 | #MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/VnielCg1tj
आयसीसी टूर्नामेंटमध्ये विराट कोहली टॉपर
दरम्यान, आयसीसी क्रमवारीत मात्र विराट कोहलीच अव्वल आहे. इंग्लंडविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर, रोहित शर्मा आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. भारतीय फलंदाज विराट कोहली आणि ख्रिस गेल यांना आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक 11 वेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला आहे. त्यामागोमाग रोहित शर्मासह सचिन तेंडुलकर, महेला जयवर्धने आणि शेन वॉटसन यांना सामनावीर पुरस्कार 10 वेळा मिळाला आहे.
Most player of the match awards in ICC white-ball events:
— CricTracker (@Cricketracker) October 29, 2023
11 - Virat Kohli
11 - Chris Gayle
10 - Rohit Sharma
10 - Mahela Jayawardene
10- Sachin Tendulkar
10 - Shane Watson
9 - AB de Villiers
9 - Sanath Jayasuriya
9 - Yuvraj Singh pic.twitter.com/xLtQ5UacS0
टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय
भारतीय संघाने रविवारी ICC ODI विश्वचषक (ICC ODI World Cup-2023) मध्ये सलग सहाव्या सामन्यात विजय मिळवला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावत 229 धावा केल्या, त्यानंतर इंग्लंडचा संघ 34.5 षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.