'chief slector ki cheap selection', मोहम्मद आमीरनं काढले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वाभाडे
PCB : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून यावेळ काही दिग्गज क्रिकेटपटूंना संधी न दिल्याचं दिसून आलं आहे.
Mohammad Amir Slams Chief Slectors : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आगामी टी20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) याने थेट निवडकर्त्यांवरच टीकास्त्र सोडत 'चीफ सिलेक्टर्सचं चीप सिलेक्शन' असं ट्वीट केलं आहे. संघनिवडीदरम्यान आमीरला वगळल्याचं दिसून आलं त्यानंतरच त्याने हे ट्वीट केलं आहे.
मोहम्मद आमीर हा एकेकाळी पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज असायचा. फिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. 2020 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेत तो मैदानात परतला. मात्र, अद्यापपर्यंत त्याचा पुन्हा राष्ट्रीय संघात समावेश झालेला नाही. नुकतीच आशिया कप स्पर्धेवेळी शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाल्यावरही मोहम्मदच्या नावाची चर्चा होती. पण तेव्हाही त्याल संधी मिळाली नाही. ज्यानंतर आता विश्वचषकाच्या संघातही तो नसल्याने त्याचा चांगलाच तीळपापड झाल्याचं दिसून आलं.
chief slector ki cheap selection 😆
— Mohammad Amir (@iamamirofficial) September 15, 2022
कसा आहे संघ?
विश्वचषकासाठीच्या पाकिस्तानच्या संघाचा विचार करता काही दिग्गजांना यावेळी संधी मिळालेली नाही. दरम्यान आशिया चषकात फखर जमानला लौकिकास साजेशी खेळी करता आली नव्हता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात त्याला 15 जणांमध्ये स्थान देण्यात आले नाही. फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यासोबत मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी यांनाही राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. फखर जमान दुखापतग्रस्त असल्यामुळे अंतिम 15 मध्ये स्थान देण्यात आलं नसल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे. दुखापतीमुळे आशिया चषक खेळू न शकणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीचं पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झालेय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी शाहीन शाह आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शाम मसदूलाही स्थान देण्यात आलेय. आसिफ अली, हैदर अली आणि इफ्तिखार अहमद यांनाही अंतिम 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेय.
2022 टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर
राखीव खेळाडू - फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी
हे देखील वाचा-