एक्स्प्लोर

मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द

Eknath Shinde : मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

नाशिक : नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठीही समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी हे बदल करण्यास अनुकूलता दर्शवली.

एकनाथ शिंदे यांचा नाशिकच्या विकासकांशी संवाद 

नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील विविध उद्योजक, संघटना आणि मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी नाशिक शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी मुंबई, पुणे ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही समान नियम लागू करावे अशी मागणी क्रेडाईच्या वतीने करण्यात आली. याबाबत सामंत यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधून क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. नाशिक मधील विकासकांनी मांडलेली अडचण समजून घेत त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यावर नाशिकमध्येही समान नियम लागू करू असे सांगितले. 

मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणी नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार 9 मीटर रुंदीच्या रस्त्यांना लागून असलेल्या इमारतींना 1.8 ते 2 आणि त्यावर अधिक 0.5 इन्सेटिव्ह एफएसआय  असा 2.5 पर्यंत एफएसआय मिळत असल्याने रस्त्यालगत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणे विकासकाना व्यवहार्य ठरते. मात्र, नाशिकमध्ये तो फक्त 1.4 पर्यंतच मिळत असून अतिरिक्त 0.3 टक्के एफएसआय विकत घ्यावा लागतो. त्यामुळे नऊ मीटर रस्त्याला लागून असलेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचे क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणी इमारतीची उंची मोजताना पोडियम पार्किंग सोडून मोजली जाते मात्र नाशिकमध्ये ती पोडियम पार्किंग सहित मोजली जाते त्यामुळे विकासकाना त्याचे नुकसान होत असल्याचे क्रीडाईच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.यावर या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी निवडणुकीनंतर मुंबई, पुणे, ठाण्याप्रमाणे  नाशिक शहरातही समान नियम लागू केले जातील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसे निर्देश नगरविकास विभागाला देण्यात येतील असेही शिंदे यांनी यावेळी फोनवरून बोलताना सांगितले.

नाशिक शहरात 9 मीटर रस्त्याला लागून असलेल्या इमारतींची संख्या 8 ते 10 हजार एवढी आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही समान नियम लागू झाल्यास त्याचा मोठा फायदा या इमारतींच्या पुनर्विकासाला होईल. आपले म्हणणे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून तत्काळ याबाबत ठोस कारवाई केल्याबद्दल नाशिक क्रीडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Operation Tiger: ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार? नाशिकमध्ये सस्पेन्स वाढलेला असतानाच दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र, 'त्या' व्हायरल फोटोने भुवया उंचावल्या!
ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार? नाशिकमध्ये सस्पेन्स वाढलेला असतानाच दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र, 'त्या' व्हायरल फोटोने भुवया उंचावल्या!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget