T20 World Cup 2022: पाकिस्तानच्या जखमेवर मीठ! अन्य दोन स्टार खेळाडूंना दुखापत, टी-20 विश्वचषकापूर्वी बाबरचं टेन्शन वाढलं
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असून सर्व संघांची तयारी जोरात सुरू आहे. पण दुसरीकडं पाकिस्तानच्या संघाच्या अडचणी कमी व्हायचं नावं घेईनात.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असून सर्व संघांची तयारी जोरात सुरू आहे. पण दुसरीकडं पाकिस्तानच्या संघाच्या अडचणी कमी व्हायचं नावं घेईनात. संघातील खेळाडू सतत दुखापतग्रस्त होत असल्यानं कर्णधार बाबर आझम आणि पाकिस्तानच्या संघाचं टेन्शन वाढलंय. आशिया चषकापूर्वी मोहम्मद वसीम आणि संघाचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळं त्यांना आशिया चषक स्पर्धेला मुकावं लागलं होतं. यातच फखर जमान आणि मोहम्मद रिझवानला दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. हे दोन्ही खेळाडू गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त आहेत. तसेच मोहम्मद वसीम दुखापतीतून सावरल्यानं पुन्हा संघात सामील झालाय.
मोहम्मद रिझवान इग्लंडविरुद्ध सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं फखर जमानला इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत विश्रांती दिलीय. तर, पाकिस्तानच्या टी-20 विश्वचषक संघात त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, इंग्लंडविरुद्ध कराचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सुरुवातीच्या टी-20 सामन्यात मोहम्मद रिझवान खेळणार नसल्याची माहिती समोर आलीय. त्याच्या जागी मोहम्मद हारिसला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
फखर जमानच्या दुखापतीवर पीसीबीचं स्पष्टीकरण
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं फखर जमानच्या दुखापतीबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. त्यानुसार फखर जमान रिहॅबसाठी शुक्रवारी लंडनला रवाना होणार आहे. नुकतंच यूएईमध्ये खेळण्यात आलेल्या टी-20 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना फखरच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. प्रोटोकॉलनुसार,फखरला लवकरात लवकर दुखापतीतून सावरण्यासाठी पीसीबीनं सावरण्यासाठी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणार्या तज्ञांसोबत वैद्यकीय उपचारांचं वेळापत्रक तयार केलंय.
शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीबाबत अपडेट्स
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रक शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीबाबत महत्वाची अपडेट्स दिलीय. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीनंतर संघात परतलाय. सध्या शाहीन लंडनमध्ये रिहॅबमध्ये आहे. शाहीन दुखापतीतून सावरत असून आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी तो पूर्णपणे बरा होईल. महत्वाचं म्हणजे, शाहीन आफ्रिदी अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसून त्याची इग्लंडविरुद्ध सात सामन्यांच्या टी-20 मालिकेत संघात निवड झालीय.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर
राखीव खेळाडू- फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी
हे देखील वाचा-