IND vs BAN : पुणेकरांनो मॅच बघायला जाताय? मग वाहतुकीतील बदल जाणून घ्या, नाहीतर ट्रॅफिकने हैराण व्हाल!
India vs Bangladesh, Pune Traffic Update : आज एमसीए स्टेडिअमवर विश्वचषक 2023 मधील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे आज पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
![IND vs BAN : पुणेकरांनो मॅच बघायला जाताय? मग वाहतुकीतील बदल जाणून घ्या, नाहीतर ट्रॅफिकने हैराण व्हाल! IND vs BAN Match pune routes changed as gahunje braces for traffic surge as india faces bangladesh in odi world cup 2023 Pune Traffic marathi news IND vs BAN : पुणेकरांनो मॅच बघायला जाताय? मग वाहतुकीतील बदल जाणून घ्या, नाहीतर ट्रॅफिकने हैराण व्हाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/fad7d3aea1e2ea4b981bbc9632fbb0681693718247736689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : भारतात क्रिकेट विश्वचषकाला (World Cup 2023) दमदार सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील (Mens Cricket World Cup 2023) पाच सामने पुण्यातील (Pune News) गहुंजे स्टेडिअम (MCA Stadium, Gahunje) वर खेळण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. आज एमसीए स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) विश्वचषक 2023 मधील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. तब्बल 27 वर्षांनंतर क्रिकेट सामने पुण्यात होणार असल्यानं क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे. या मात्र गहुंजेला जाण्यासाठी रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
क्रिकेटप्रेमींनो सामना पाहायला जाण्याआधी वाहतुकीचे बदल जाणून घ्या.
देहू रोड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. आज हजारो लोक सामना पाहण्यासाठी गहुंजे स्टेडियम गाठणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
- मामुर्डी अंडर (मासुलकर फार्म) येथून कृष्णा चौकात जाण्यास मनाई आहे. पर्यायी मार्ग - लोढा येथून येणाऱ्या वाहनांनी मामुर्डी अंडरपास येथे उजवे वळण घेऊन बापदेव बुवा मार्गे कृष्णा चौकाकडे जावे.
- मामुर्डी गावापासून मामुर्डी अंडरपास (मासुलकर फार्म) बाजूने प्रवेश बंदी आहे. पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहनांनी मामुर्डी जकात नाक्यामार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जावे.
- सामना संपल्यानंतर मामुर्डी अंडरपास बाजूने मामुर्डी अंडरपासकडे जाण्यासाठी प्रवेश साईनगर परिसरातील पार्किंग क्र. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 मधील वाहनांसाठी बंद राहील.
- वाहने साईनगर रोड ते सेंट्रल चौक मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग दोन- या मार्गावरील वाहने शितळा देवी-मामुर्डी जकात नाका मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतील.
- अत्यावश्यक सेवा वाहने वगळून कार पासधारक वाहने आणि सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गहुंजे ब्रिज Y जंक्शन मार्गे स्टेडियममध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे.
- मुंबईहून येणाऱ्या आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या गाड्यांना देहू रोडने एक्स्प्रेस वेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडने जाण्यास बंदी आहे.
PMPML बसेसचीदेखील सोय पुढीलप्रमाणे :
क्रिकेट चाहत्यांसाठी पीएमपीएमएलकडून पुणे मनपा भवन, कात्रज आणि निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
क्रिकेट सामन्याचा बसेस सुटण्याचे ठिकाणं
- 19 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर या दिवशी बसेसची सोय करण्यात आली आहे.
- पुणे मनपा बसस्थानक - दुपारी 11:00, 11:35, 12 :00 वाजता बस असणार आहे त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
- कात्रज बसस्थानक - दुपारी 11:00, 11:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
- निगडी बसस्थानक - दुपारी 12:00, 12:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
India vs Bangladesh : आज फलंदाज षटकारांचा पाऊस पाडणार की, गोलंदाजांची सरशी होणार? पुण्यातील खेळपट्टीचा अहवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)