एक्स्प्लोर

India vs Bangladesh : आज फलंदाज षटकारांचा पाऊस पाडणार की, गोलंदाजांची सरशी होणार? पुण्यातील खेळपट्टीचा अहवाल

IND vs BAN Pitch Report : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने विजयाची हॅटट्रिक केली असून आता लक्ष्य गुणतालिकेतील अव्वल स्थानावर आहे. पुण्यातील खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या.

India vs Bangladesh : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघ (Team India) ने एकदिवसीय विश्वचषकात (ODI World Cup) आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत (World Cup Points Table) दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक केली असून आता लक्ष्य गुणतालिकेतील अव्वल स्थानावर आहे. त्यासाठी बांगलादेश विरोधातील सामना जिंकणं आवश्यक आहे.

भारत सलग चौथा विजय मिळवणार?

टीम इंडिया खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक 2023 मध्ये भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी दिसून येत आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आजचा सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर रंगणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होईल.

फलंदाजीसाठी पोषक की गोलंदाज ठरणार घातक?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. हे मैदान लहान आकाराचं आहे. छोटं मैदान असल्यामुळेही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. या खेळपट्टीवर संपूर्ण सामन्यात धावा करणं खूप सोपं आहे. या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळाल्याने येथे सहज मोठे फटके मारता येतात. याशिवाय ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही योग्य आहे. या मैदानावर आतापर्यंत 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये संघांनी 8 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात चाहत्यांना मोठी धावसंख्या पाहायला मिळतील. दरम्यान, ही खेळपट्टी यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच वापरली जात आहे.

कशी आहे एमसीए स्टेडियमची खेळपट्टी?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 एकदिवसीय सामन्यांपैकी 4 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 307 आहे. त्याच वेळी, नंतर फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 281 धावा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की एकदिवसीय सामन्यात एकदाही 225 पेक्षा कमी धावा केल्या नाहीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IND vs BAN, Weather Report : भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? पुण्यातील हवामान कसं असेल? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget