एक्स्प्लोर

World Cup 2023 Final : मेगाफायनल... मेगामुकाबला... जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकाची लढत, दोन दिग्गज संघ आमने-सामने

IND vs AUS, ODI World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलचा महामुकाबला रंगणार आहे.

India vs Australia, World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आज बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 2003 च्या विश्वचषकाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत रंगला होता आणि आता यंदाच्या हंगामातील शेवटचा आणि निर्णायक सामना सुद्धा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये उपांत्य फेरीत प्रवास संपला होता. 

मेगाफायनल... मेगामुकाबला...

भारताचा विश्वचषक 2023 चा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला. यानंतर टीम इंडियाने सलग दहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 'मेन इन ब्लू'चा सामना पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी 2525 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांनी 85 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय खेळाडूंची कामगिरी कांगारूंना धडकी भरायला लावणारी आहे. 

सामन्यापूर्वी एअर फोर्सचा एअर शो

आज फायनल सामन्यापूर्वी एअर फोर्सचा एअर शो आणि सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स होणार आहेत. देश-विदेशातील अनेक दिग्गज मंडळीही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमता आहे. त्यामुळे लाखो चाहते या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या क्रिकेट विश्वचषक फायनलमधील ही सर्वात भव्य स्पर्धा ठरू शकते. या मेगाफायनलची भव्यता आणि उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर

विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत. भारताने सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. क्रिकेट विश्वात दोन्ही संघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs AUS Head to Head)

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 150 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं पारड जड आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळाले आहेत. कांगारूने एकूण 83 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 57 विजय मिळवले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले. बरं, दोन्ही संघांमधील गेल्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर भारतीय संघानेच वर्चस्व गाजवले आहे. टीम इंडियाने तीन सामने जिंकले आहेत. आजचा अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानावर हे दोन्ही संघ यापूर्वी तीनदा भिडले आहेत. येथेही टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत.

खेळपट्टी कशी असेल? (Narendra Modi Stadium Pitch Report)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. या विश्वचषकाचे चार सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले आहेत. यामध्ये तीन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला सहज विजय मिळाला. यासोबतच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेही विजयाची नोंद केली आहे. अशा स्थितीत येथे धावांचा पाठलाग सोपा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची ठरू शकते. मात्र, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक फार महत्त्वाची मानत नाहीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

World Cup 2023 Final : सूर्यकुमारऐवजी अश्विनला संधी मिळणार? ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget