(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya : 'बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या टीम इंडियाचा,' ऑस्ट्रेलियात पांड्याचा वाढदिवस साजरा, पाहा PHOTO
Hardik Pandya Birthday : स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस असून सध्या तो टीम इंडियासोबत आगामी टी20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथे आहे.
Hardik Pandya 29th Birthday : भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा आज वाढदिवस असून सध्या तो कमाल फॉर्ममध्ये असल्याने त्याचा वाढदिवसही जल्लोषात साजरा होत आहे. पांड्या आपला 29 वा वाढदिवस ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबक साजरा करत आहे. आगामी टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पांड्याही संघासोबत असून त्याचा केक यावेळी कट करण्यात आला आहे. बीसीसीआयनं केट कट करतानाचे खास फोटो अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहेत. यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ स्टायलिश लूकमध्ये दिसत असून पांड्या केक कट करताना दिसत आहे.
Many many happy returns of the day @hardikpandya7. 🎂😊 #TeamIndia pic.twitter.com/EpyTMsGEGK
— BCCI (@BCCI) October 11, 2022
कशी आहे पांड्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 54 विकेट घेतल्या आणि 989 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 148.5 इतका आहे. हार्दिक एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक यशस्वी ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 66 सामन्यांमध्ये 63 विकेट घेतल्या असून 1 हजार 386 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची फलंदाजी सरासरी 34 धावांची आहे. हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये तितका प्रभावी ठरलेला नाही. आतापर्यंत त्याला 11 कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं 17 विकेट घेतल्या आहेत आणि 532 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2022 टर्निंग पॉईंट
आयपीएल 2022 मधून हार्दिक पांड्यानं पुन्हा मैदानात पुनरागमन केलं. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामात ट्रॉफी जिंकली. याशिवाय हार्दिकनं फलंदाजीसह गोलंदाजीतही जबरदस्त कामगिरी करून दाखवली. या हंगामात हार्दिक पांड्यानं 487 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या. दरम्यान, अनेक सामन्यात त्यानं मॅच विनिंग खेळी केली. ज्यामुळं भारतीय संघातं त्याचं पुनरागमन झालं. तेव्हापासून हार्दिक पांड्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताच्या आयर्लंड दौऱ्यात त्यानं भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व केलं. आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका भारतानं 2-0 अशी जिंकली.
हे देखील वाचा-