ENG vs NZ, T20 World Cup 2022 : न्यूझीलंडची झुंज व्यर्थ, इंग्लंड 20 धावांनी विजयी, पाहा ग्रुप 1 ची गुणतालिका
ENG vs NZ : विश्वचषक स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आज सामना पार पडला असून इंग्लंडने 20 धावांनी सामना जिंकत गुणतालिकेतही थेट दुसरं स्थान मिळवलं आहे.
ENG vs NZ, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) या दोन संघात सामना पार पडला. बऱ्यापैकी चुरशीचा झालेला सामना इंग्लंडने 20 धावांनी जिंकला. सामन्यात आधी फलंदाजी करत इंग्लंडने 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यानंतर 180 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सामन्यात काही काळ चांगली खेळी दाखवली ते जिंकतील अशा आशाही निर्माण झाल्या होत्या. पण अखेर इंग्लंज गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत 159 धावांत न्यूझीलंडला रोखलं आणि 20 धावांनी सामना जिंकला.
सामन्यात आधी नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो निर्णय अगदी योग्य निघाला सलामीवीरांनी दमदार भागिदारी केली. कर्णधार जोस बटलरने सामन्याक 73 धावांची तुफान खेळी केली. तर हेल्सने 52 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने 20 धावांचं योगदान दिलं असून इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. पण सलामीवीरांच्या भागिदारीच्या जोरावर इंंग्लंडने 179 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पण केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स यांनी चांगली भागिदारी करत डाव सावरला. दोघे सामना जिंकवून देतील असे वाटत होते. पण तेव्हात केन 40 तर ग्लेन 62 धावा करुन बाद झाला आणि त्यानंतर इतर खेळाडूंना खास कामगिरी करता न आल्याने 159 धावाच न्यूझीलंड करु शकला. ज्यामुळे 20 धावांनी सामना इंग्लंडने जिंकला. सामनावीर म्हणून 73 धावांची तुफान खेळी करणाऱ्या जोस बटलरला सन्मानित करण्यात आलं.
England ward off Glenn Phillips to go level on points with Australia and New Zealand in Group 1 of the #T20WorldCup 2022 🙌#ENGvNZ | 📝: https://t.co/LTgE7VWHFc pic.twitter.com/8474h9ZNNk
— ICC (@ICC) November 1, 2022
आजच्या सामन्यानंतर ग्रुप 1 ची स्थिती
ग्रुप-1 मध्ये आज इंग्लंडने न्यूझीलंडला मात देण्याआधी श्रीलंका संघाने अफगाणिस्तानला मात दिली. ज्यामुळे अफगाणिस्तानचं स्पर्धेतील आव्हान बऱ्यापैकी संपुष्टात आलं आहे. दरम्यान या विजयानंतर इंग्लंडने गुणतालिकेतही थेट दुसरं स्थान मिळवलं आहे. तर पराभवानंतरही न्यूझीलंड अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. तिघांकडेही 5 गुण असून नेटरनरेटमुळे तिघांमध्ये फरक दिसून येत आहे. तर नेमकी गुणतालिका कशी आहे पाहूया...
संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णीत | गुण | नेट रन रेट |
न्यूझीलंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | 2.233 |
इंग्लंड | 4 | 2 | 1 | 1 | 5 | 0.547 |
ऑस्ट्रेलिया | 4 | 2 | 1 | 1 | 5 | -0.304 |
श्रीलंका | 4 | 2 | 2 | 0 | 4 | -0.457 |
आयर्लंड | 4 | 1 | 2 | 1 | 3 | -1.544 |
अफगाणिस्तान | 4 | 0 | 2 | 2 | 2 | -0.718 |
हे देखील वाचा-