PAK vs BAN: भारतानंतर पाकिस्तानही सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, निर्णायक सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सनं नमवलं
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांग्लादेशचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या संघानं बांग्लादेशचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह पाकिस्तानच्या संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशनं पाकिस्तानसमोर 128 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य 18.1 षटक आणि पाच विकेट्स राखून पूर्ण केलं. स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात चार विकेट्स घेऊन बांगलादेशच्या संघाला बॅकफूटवर ढकललं.
ट्वीट-
A five-wicket win to secure a spot in the semi-finals 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 6, 2022
Well done, boys! 🙌#WeHaveWeWill | #T20WorldCup | #PAKvBAN pic.twitter.com/2sOpviBsad
पाकिस्तानच्या संघाची सेमीफायनलमध्ये धडक
या सामन्यात बांगलादेशच्या संघानं दिलेल्या 128 लक्ष्याच्या पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार बाबर आझम (25 धावा) आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानं (32 धावा) यांच्यात पहिल्या विकेट्ससाठी 57 धावांची भागेदारी झाली. त्यानंतर बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानच्या संघाला पहिला धक्का लागला. तर, पाकिस्तानची धावसंख्या 61 वर असताना बाद होऊन माघारी परतला.या सामन्यात सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्य संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. या सामन्यात शाहीन आफ्रिदीनं चार विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी व्यतिरिक्त शादाब खाननंही चांगली गोलंदाजी केली. त्यानं या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या.या विजयासह पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशच्या संघाला हरवून सेमीफायनलमध्ये धडक दिली.
बांगलादेशच्या संघाची खराब फलंदाजी
अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला बांगलादेशचा संघ या सामन्यात फॉर्ममध्ये दिसत होता. बांगलादेशनं सामन्याच्या 10.3 षटकात 2 विकेट्स गमावून 73 धावा केल्या. या सामन्यात बांगलादेशचा संघ पाकिस्तानसमोर मोठी धावसंख्या उभारेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानने गोलंदाजीत दमदार पुनरागमन केले आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ केवळ 127 धावाच करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने हे लक्ष्य सहज गाठले आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केलं.
हे देखील वाचा-