एक्स्प्लोर

Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा

Vinod Tawde in Virar: नालासोपारा येथे पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला.

Vinod Tawde in Virar Maharashtra Vidhan Sabha Election 2024:  नालासोपारा येथे पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजप केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह भाजप नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक यांना हॉटेलमध्ये घेरून दोन्ही गटात तुफान राडा झाल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत होटलमध्ये हा राडा झाला.यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती. 

सदर घटनेवर हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?

5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. 

अतुल भातखळकर काय म्हणाले?

पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक असे आरोप करत आहेत, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. तुम्ही रडीचा डाव खेळू नका, लोकशाही आहे, सामोरे जावा. तसेच सदर प्रकरणाबाबत पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करा, असं अतुल भातखळकर हितेंद्र ठाकूर यांना म्हणाले. 

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

नालासोपाऱ्यामधील या घटनेवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या जर आरोप केला की, शरद पवार पैसे वाटताय, उद्धव ठाकरे पैसे वाटताय, विनोद तावडे पैसे वाटताय, मग आपण विश्वास तरी ठेऊ का?, विनोद तावडे खूप मोठे नेतृत्व आहे. विनोद तावडे लक्ष्मण रेषा न ओलांडणारं नेतृत्व आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोणत्या स्थरावरचे नेते आहेत, ते पैसे वाटतील का?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

नेमकं काय घडलं?

बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती. 

महत्त्वाच्या बातम्या

MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Embed widget