रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Baramati Assembly Constituency : युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्सवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला होता.
बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार होणार आहे. मात्र मतदानाआधीच बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Vidhan Sabha Constituency) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांचे वडील श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांच्या मालकीच्या शरयू मोटर्सवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला होता. यावर आता युगेंद्र पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बारामतीत पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात लढाई होत आहे. त्यातच मतदानाच्या एक दिवस आधी श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?
याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, काल रात्री 10 ते 12 पोलिसांचं पथक आलं होतं. तिथे आमचा व्यवसाय आहे. पोलीसांना तिथं काही मिळालं नाही, आम्ही कायदा पाळणारी लोकं आहोत. कालही आम्ही पोलिसांना सहकार्य कलं.तक्रार कोणी केली, याबाबत मला माहिती नाही. तक्रार कोणी दिली याबाबत विचारले असता आम्हाला काहीही सांगितलं नाही. जोपर्यंत याबाबत संपूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत याबाबत बोलणं योग्य नाही. आम्ही कायद्याने या गोष्टीला सामोरे जायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, रात्रीच्या सुमारास तीन-चार पोलीस आले होते, त्यांच्यासोबत पाच ते सहा सरकारी अधिकारी होते. रात्री शोरूम बंद असते, पण ते आले आणि त्यांनी चौकशी केली. पोलिसांनी म्हटले की आम्हाला इथे तपासणी करायची आहे. येथील तक्रार आमच्यापर्यंत आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तक्रार कुठून आली याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. निवडणुकीत अशा प्रकारच्या घटना होत असतात, सत्तेत असल्यावर काहीही करता येते, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार, निवडणूक आयोगाचं सर्च ऑपरेशन, नेमकं काय सापडलं?
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा