एक्स्प्लोर

Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियात अटक; महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप

Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे.

Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका (Sri Lankan Cricketer Danushka Gunathilaka Arrested) याला बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह (Sri Lanka Cricket Team) गुणतिलाका हा ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी दाखल झाला आहे. गुणतिलाकाने 2 नोव्हेंबर रोजी महिलेवर अत्याचार केला असल्याची माहिती आहे. त्यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली आहे. दनुष्का गुणतिलाका याच्या विरोधात 29 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या निवासस्थानीच दनुष्काने तिच्यावर अत्याचार केला. 

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. अॅपवर दोघांमध्ये चॅटिंग झाल्यानंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. दनुष्का गुणतिलाका हा पीडित महिलेच्या घरी दोन नोव्हेंबर 2022 रोजी गेला होता. त्याचवेळी त्याने अतिप्रसंग केला असल्याची तक्रार आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली. चौकशी आणि तपासानंतर दनुष्काला सिडनीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. या ठिकाणी श्रीलंकन संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छेविरोधात लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली. 

दुखापत झाल्याने संघातून बाहेर 

टी-20 विश्वचषक स्पर्धेत दनुष्का गुणतिलाका हा श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. मात्र, तो फक्त एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरोधात त्याने एकमेवक सामना खेळला. त्यानंतर जखमी झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याऐवजी अशीन बंदारा याचा समावेश श्रीलंकेच्या संघात करण्यात आला होता. दुखापतीमुळे  स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता. 

दनुष्का गुणतिलाका हा डावखुरा फलंदाज असून त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2500 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. गुणतिलाकाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दनुष्का गुणतिलाकाने 47 वनडे, 46 टी-20 सामने आणि आठ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने वनडे मध्ये दोन शतकं झळकावली आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या

T20 World Cup 2022 : नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर 13 धावांनी विजय, टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget