BAN vs NED: टी-20 विश्वचषकातील आणखी एक थरारक सामना; अखेरच्या षटकात बांग्लादेशनं नेदरलँड्सला नमवलं
होबार्टच्या (Hobart) बेलेरिव्ह ओव्हल (Bellerive Oval) स्टेडियमवर खेळण्यात आलेला सामना रोमहर्षक ठरला.
BAN vs NED, T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत बांग्लादेशनं नेदरलँड्सचा (Bangladesh vs Netherlands) नऊ धावांनी पराभव केला. होबार्टच्या (Hobart) बेलेरिव्ह ओव्हल (Bellerive Oval) स्टेडियमवर खेळण्यात आलेला सामना रोमहर्षक ठरला. या स्पर्धेतील बांग्लादेशचा पहिलाच सामना होता. तर, नेदरलँडचा संघ पात्रता फेरीच्या सामन्यांनंतर सुपर 12 मध्ये पोहोचलाय.
या सामन्यात नेदरलँड संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. कारण बांगलादेशच्या संघाला 20 षटकात आठ विकेट्स गमावून 144 धावापर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून अफिफ हुसेननं सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तर, नजमुल शांतोनं 25 धावा केल्या. नेदरलँड्सकडून व्हॅन मेकर्न आणि बेस डिल्डे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. इतर 4 गोलंदाजांना प्रत्येकी एक- एक विकेट मिळाली.
आयसीसीचं ट्वीट-
Netherlands fight till the end but Bangladesh prove to be too good on the day 🙌#T20WorldCup | #BANvNED | 📝: https://t.co/o5zkzQ2PpD pic.twitter.com/wTvRYQjfcA
— ICC (@ICC) October 24, 2022
कॉलिन अॅकरमन अर्धशतकी झुंज व्यर्थ
दरम्यान, 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड संघाला पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन धक्के बसले. नेदरलँड्सचा संघाकडून कॉलिन अॅकरमननं एकाकी झुंज दिली. त्यानं 48 चेंडूत 62 धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची त्याला मिळाली नाही. नेदरलँड्सचा संघ 20 षटकात 135 धावांवर ऑलआऊट झाला. हा सामना बांग्लादेशनं नऊ धावांनी जिंकला. बांग्लादेशकडून तस्किन अहमदनं चार, तर हसन महमूदनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, शाकिब अल हसन आणि सोमया सरकारला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
आयसीसीची इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
हे देखील वाचा-