Wrestling Protest: 'बंद खोलीत केलं जात होतं महिला खेळाडूंचं शोषण, आमच्याकडे पुरावेही आहेत'; कुस्तीपटूंचा दावा
Sexual Harassment of Wrestlers : दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटने महिला खेळाडूंचं लैगिंक शोषण होत असल्याचा मोठा दावा केला होता, ज्यानंतर यासंबधी पुरावे असल्याचंही सांगितलं जात आहे.
Vinesh Phogat On Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनेश फोगटसारख्या (Vinesh Phogat) दिग्गज कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरुच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुन्हा एकदा खेळाडूंची भेट देखील घेणार आहेत.
बंद खोल्यांमध्ये केले जात होते शोषण : विनेश फोगट
विनेश फोगटने क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर काही मोठे खुलासे केले आहेत. तेव्हा ती म्हणाली होती की, "महिला खेळाडूंचे बंद खोलीत शोषण केले जात होते. ज्या मुलींचे शोषण झाले त्यांच्याकडे स्वतः पुरावे देखील आहेत." प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विनेश फोगटने आरोप केला होता की, "लखनौमध्ये राष्ट्रीय शिबिर आयोजित करण्याचे कारण काय? लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा दावा तिने यावेळी केला आहे. लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षक आणि WFI अध्यक्षांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्यांचा दावा तिने केला आहे. फोगटने माहिती देताना हे ही स्पष्ट केले की 'आपल्याला अशा शोषणाचा सामना करावा लागला नाही. महिला कुस्तीपटूंचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिने यावेळी केला. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप करताना ती म्हणाली की, काही महिला WFI अध्यक्षांच्या सांगण्यावरुन महिला कुस्तीपटूंशी संपर्क साधतात. लखनौमध्ये त्यांचे घर आहे, त्यामुळे ते तेथे शिबिरं तिथेच आयोजित करतात, जेणेकरुन मुलींचे शोषण सहज करता येईल. असा दावा फोगटने केला.
आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, पण ते सार्वजनिक करणार नाही : विनेश फोगट
महिला कुस्तीपटू विनेश फोगटचा आरोप आहे की WFI अध्यक्ष महिला कुस्तीपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न देखील करतात. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने दावा केला की त्यांच्याकडे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरोधात सर्व पुरावे आहेत. त्यांच्यासोबत 5 ते 6 मुली आहेत ज्यांचे लैंगिक शोषण झाले आहे आणि ते सिद्ध करणारे पुरावे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. पण आम्ही हे सर्व सार्वजनिक करु इच्छित नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन ब्रिजभूषण शरणसिंह यांचा राजीनामा घेऊन त्यांना तुरुंगात पाठवू, असं कुस्तीपटूंनी सांगितलं.
हे देखील वाचा-