एक्स्प्लोर

Vinesh Phogat : महिला कुस्तीपटूकडून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप, दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंकडून निदर्शनं

Wrestlers Protest At Jantar Mantar: : भारतातील अव्वल कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचा निषेध करत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केलं आहे. या कुस्तीपटूंनी संघटनेवर काही गंभीर आरोप केले आहेत.

Vinesh Phogat : देशातील अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंनी बुधवारी (18 जानेवारी) दिल्लीच्या जंतर मंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात निदर्शने केली. धक्कादायक म्हणजे कुस्तीपटूंनी त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील केला आहे. याबाबत महिला कुस्तीपटूने सांगितलं की, 'अध्यक्ष बदलेपर्यंत संप सुरूच राहणार आहे.' ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार देखील आहेत.

महिला कुस्तीपटूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांनी महिला खेळाडूंचे शोषण केले आहे. खेळाडू खेळू शकत नाही म्हणून फेडरेशन जबरदस्तीने खेळाडूंवर बंदी घालते. कोणत्याही खेळाडूला काही झाले तर त्याला कुस्ती संघटनेचे अध्यक्ष जबाबदार असतील, अशाप्रकारचे आरोप या आंदोलनात करण्यात आले आहेत. जंतरमंतरवर झालेल्या या आंदोलनात बरेत नामवंत आणि ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू सहभागी झाले होते.  

नेमके कोणते आरोप केले?

उपस्थित महिला कुस्तीपटूंनी आरोप करताना सांगितले की, 'फेडरेशनचे विशेष प्रशिक्षक राष्ट्रीय शिबिरात महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण करतात, त्यानंतर तक्रार करूनही कारवाई होत नाही. अध्यक्षांनी अनेक महिला खेळाडूंचे शोषणही केलं आहे. लखनौमध्ये एका शिबिराचे आयोजन केले जाते जेणेकरून ते त्यांच्या घरीच आमचं शोषण करू शकतात, ते आमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप देखील करतात. तसंच पुढे बोलताना त्यांनी सांगितलंकी म्हणाली  टोकियो ऑलिम्पिकनंतर मी पंतप्रधानांकडे तक्रार केली होती, त्यांनी काही होणार नाही असं म्हणाले होते, पण त्यानंतर असोसिएशन मला निलंबित करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या जीवालाही धोका आहे. फेडरेशनचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. एवढी संपत्ती ऑलिम्पिक पदक विजेत्याकडे देखील नाही.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून स्पष्टीकरण

कुस्तीपटूंच्या या आरोपांवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की,''मला माहित नाही की आरोप काय आहेत, पण मी लगेच विमानाचे तिकीट आणले असून तेथे पोहचणार आहे. विनेशने लावलेला सर्वात मोठा आरोप,जो आहे त्याबद्दल कोणताही खेळाडू पुढे येऊन बोलू शकतो का? मागील दहा वर्षांपासून फेडरेशनकडून काही अडचण आली नाही का? नवीन नियम आणि कायदे आणले जातात तेव्हा समस्या समोर येतात. कोणत्याही खेळाडूचा छळ झालेला नाही. तसे झाले तर मी स्वतःला फाशी देईन. यात कोणत्यातरी उद्याोगपतीचा हात आहे. हे एक षडयंत्र आहे.

काय म्हणाला बजरंग पुनिया?

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, कुस्तीला दलदलीतून वाचवायचे आहे, खेळाडूंवर अत्याचार होत आहेत. एक-दोन दिवसांपूर्वी नियम बनवले जातात जे खेळाडूंवर लादले जातात. असोसिएशनचे अध्यक्ष केवळ प्रशिक्षक आणि पंचाची भूमिका बजावतात, गैरवर्तन करतात. एवढेच नाही तर प्रायोजक टाटा मोटर्सकडून कोणतीही मदत न मिळाल्याने खेळाडूंना असहाय्य वाटत असून तक्रार केल्यास खेळाडूंवर कारवाई केली जाते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget