एक्स्प्लोर
विराट बाद होताच रोहित शर्माने मलिंगाची गळाभेट का घेतली?
विराट बाद झाल्यानंतर त्याची विकेट घेणाऱ्या मलिंगाची रोहित शर्माने गळाभेट घेतली. त्यामुळे सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.
कोलंबो : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कोलंबो वन डेत श्रीलंकेविरुद्ध वन डे कारकीर्दीतलं 29 वं शतक ठोकलं. श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने विराटला 131 धावांवर बाद केलं. मात्र विराट बाद झाल्यानंतर जो प्रसंग घडला, त्याने सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले.
विराट बाद झाल्यानंतर त्याची विकेट घेणाऱ्या मलिंगाची रोहित शर्माने गळाभेट घेतली. त्यामुळे सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. पण त्यामागचं कारणही तसंच होतं. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधील सहकारी मलिंगाने वन डे कारकीर्दीतल्या 300 विकेट पूर्ण केल्या. त्यामुळे रोहित शर्माने जवळ जाऊन अभिनंदन केलं.
मलिंगाने त्याच्या कारकीर्दीतल्या 203 व्या वन डेत 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पूर्ण करणारा तो जगातला तेरावा गोलंदाज ठरला आहे. केवळ रोहित शर्माच नव्हे, तर हार्दिक पंड्यानेही मलिंगाचं अभिनंदन केलं.
विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलंबोच्या चौथ्या वन डेत श्रीलंकेचा 168 धावांनी धुव्वा उडवला आणि धोनीच्या तीनशेव्या वन डेचं शानदार सेलिब्रेशन केलं. या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 50 षटकांत 376 धावांचं आव्हान दिलं होतं.
भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव 207 धावांत गडगडला. टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आपली विजयी आघाडी 4-0 अशी वाढवली. भारताकडून जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement