एक्स्प्लोर
Advertisement
सॅम्युअल्सची पाकिस्तानी सैन्यात सामील होण्याची इच्छा
लाहोर : वेस्ट इंडिजचा क्रिकेटर, सलामीवीर मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानी सैन्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी त्याने ही इच्छा व्यक्त केली.
36 वर्षीय सॅम्युअल्स पीएसएलचा अंतिम सामना खेळण्यासाठी लाहोर आला होता. पीएसएलमध्ये मार्लन सॅम्युअल्स पेशावर जाल्मी संघाचं प्रतिनिधत्व करतो. लाहोरमध्ये याच संघाने पीएसएलचं विजेतेपद पटकावलं
यानंतर संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यात मार्लन सॅम्युअल्सने पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचं तोंडभरुन कौतुक केलं.
पेशावर जाल्मी संघाने पीएसएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर पाकिस्तानीचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी विजेत्या संघाची भेट घेतली. पाकिस्तान लष्करप्रमुखांशी भेट झाल्यानंतर सॅम्युअल्सने प्रतिक्रिया दिली.
दीड मिनिटांच्या या व्हिडीओत सॅम्युअल्सने म्हटलं आहे की, "पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. इथे जे लोक मागील काही काळापासून क्रिकेट पाहू शकत नव्हते, त्यांच्या उदार चेहऱ्यावर या सामन्यामुळे आनंद पाहायला मिळाला. मी मनाने, हृदयाने पाकिस्तानी आहे. यामुळे पाकिस्तानात येण्याबाबत निर्णय घेण्यास फार वेळ लागला नाही."
पाकिस्तानी लष्करप्रमुखांना संबोधित करताना सॅम्युअल्स म्हणाला की, "जनरल मी तुम्हाला सॅल्युट करतो. माझ्या खांद्यावर पाकिस्तानी सैन्याचा बॅच लागण्याची मी प्रतीक्षा करत आहे. मला पाकिस्तानी सैन्याचा एक भाग बनायचा आहे. मी मरेपर्यंत या देशात येणार"
पाहा व्हिडीओ
@MarlonSamuels7 Salute from the Whole Nation for such a marvellous words. You are the campions of the hearts.Special message to the Army 1/2 pic.twitter.com/8ppPIqG9ml
— Javed Afridi (@JAfridi10) March 11, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement