एक्स्प्लोर
विराट आता किंग खान शाहरुखच्या पंगतीत, कमाईचे नवे आकडे
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कसोटी पाठोपाठ वन डे आणि टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे देण्यात आल्यानंतर त्याने कमाईमध्ये नवा विक्रम केला आहे.
डफ अँड फेलप्सने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू सध्या 617 कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. त्याच्या पुढे केवळ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र लवकरच विराट अव्वल स्थानी येण्याची शक्यता आहे.
धोनीच्या कमाईत घट
ऑक्टोबर महिन्यातील एका रिपोर्टनुसार विराट चौथ्या स्थानी होता. तर तो आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
विराट सध्या 20 ब्रँडच्या जाहिराती करत आहे. त्याला नुकतंच स्मार्टफोन कंपनी जिओनी आणि अमेरिकन टूरिस्टरने आपंल ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं आहे. तर तो केंद्र सरकारच्या 'स्किल इंडिया मिशन'चाही गुडविल अॅम्बेसेडर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement