एक्स्प्लोर
सलग 19 कसोटी सामने अपराजित राहिलेल्या विराटला पराभवाची चव

पुणे : तब्बल 19 कसोटी अपराजित राहिल्यावर भारताला अखेर पराभवाची चव चाखावी लागली आहे. हैदराबाद कसोटीत बांगलादेशवरील विजयानंतर विराट हा भारतातर्फे सलग सर्वाधिक म्हणजे 19 सामने अपराजित राहणारा कर्णधार ठरला होता.
विराटनं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांचा 18 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम मोडला होता. पण हा विक्रम आणखी उंचावण्याची किमया विराटला साधता आली नाही.
ऑगस्ट 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर थेट फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं.
कोहलीची कामगिरी खालावली
पुणे कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दोन्ही डावांत मिळून केवळ 13 धावाच करता आल्या. या कसोटीच्या पहिल्या डावात तर कोहलीला भोपळाही फोडता आला नव्हता. मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये कोहलीची ही आजवरची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.
विशेष म्हणजे कोहलीनं पुणे कसोटीच्या दोन्ही डावात डावखुऱ्या गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या डावात मिचेल स्टार्कनं कोहलीला माघारी धाडलं. तर दुसऱ्या डावात स्टीव्ह ओ'कीफनं विराटला चकवलं.
ऑस्ट्रेलिया 13 वर्षांनी भारतात जिंकली
पुणे कसोटीतील विजय हा ऑस्ट्रेलियाचा गेल्या तेरा वर्षातला भारतीय भूमीवरचा पहिलाच कसोटी विजय ठरला आहे. याआधी 2004 साली नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला 342 धावांनी हरवलं होतं.
त्यानंतर पुढच्या 11 कसोटींत 9 वेळा ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला तर दोन सामने अनिर्णित राहिले होते. पराभवांची ती मालिका स्टीव्हन स्मिथच्या टीमनं मोडली आहे. कांगारुंच्या या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या मालिकेतली चुरसही आणखी वाढली आहे.
3 तासात खेळ खल्लास, भारताचा दारुण पराभव!
पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तब्बल 333 धावांनी विजय मिळवत, तिसऱ्या दिवशीच खेळ खल्लास केला. जगातील सर्वोत्तम फलंदाजांचा संघ अशी ओळख असलेली विराट कोहलीची टीम इंडिया अवघ्या तीन तासात ढेपाळली. भारताचा दुसरा डाव अवघ्या 107 धावांत गुंडाळून, ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 441 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना, पहिल्या डावाप्रमाणेच टीम इंडियाने पुन्हा एकदा नांगी टाकली.संबंधित बातम्या
IndvsAus – भारत पराभवाच्या छायेत
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला, भारतासमोर 441 धावांचं लक्ष्य
पुण्यात टीम इंडिया गडगडली, कांगारुंकडे 298 धावांची भक्कम आघाडी
#IndvsAus – भारताचा पहिला डाव 105 धावात गुंडाळला
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पुण्यात चुरशीची लढत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
