एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO: जेम्स अँडरसनच्या टीकेला कर्णधार विराटचं उत्तर!
मुंबई: भारताविरुद्ध चौथ्या कसोटीदरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं भारतीय कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीबबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त उसळत नाही. त्यामुळे कोहलीमधील कच्चे दुवे इथं अद्याप दिसून आलेले नाहीत. त्याच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून त्याच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण कोहलीनं अत्यंत प्रगल्भतेनं हाताळलं आणि अतिशय शांतपणे हे प्रकरण संपवलं.
या संपूर्ण प्रकरणानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं या संपूर्ण प्रकरणाबाबत विराटला प्रश्न विचारला. विराटच्या दिलेल्या उत्तरानंतर सेहवागनंही कोहलीचं कौतुक केलं.
पाहा विराटनं अँडरसनच्या टीकेला नेमकं काय उत्तर दिलं:
वीरेंद्र सेहवाग: मला आनंद वाटला की, तू अँडरसनला उत्तर दिलं नाही तर अश्विननं उत्तर दिलं, अँडरसननं जे काही वक्तव्य केलं त्यानं तू निराश आहेस का?
विराट कोहली: मला अश्विननं मैदानात सांगितलं की, अँडरसन माझ्याबाबत काय म्हणाला. त्यानंतर अश्विननं त्याला सांगितलं की, 'त्यानं केलेलं वक्तव्य हे फारच निराशादायक होतं. जर आम्ही चांगले खेळलो असू तर तुम्ही ते मान्य करायला हवं.' त्यानंतर अँडरसनला कुठेतरी वाईटही वाटलं. तो म्हणालाही की, आपण बाहेर जाऊन याबाबत बोलूयात का? मी त्याला म्हटलं की, यावर चर्चा करायची गरजच नाही. जे काही आहे समोर स्कोअरबोर्डवर आहे. मला कोणताही वाद घालायचा नाही की, मी किती धावा केल्या आणि कशा केल्या. जे काही आहे ते सर्वांसमोर आहे. आणि मला असंही म्हणायचं नाही की, तुम्ही वाईट खेळ केलात. आम्ही 3-0नं जिंकणार आहोत. मी अॅशलाही तेच सांगितलं की, आपण 3-0नं जिंकणार आहोत. त्यामुळे जे काही बोललास ते सोडून दे. आता त्याला कळू दे की, आपण बरोबर वागलो नाही.VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement