एक्स्प्लोर

Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 

Vaibhav Suryavanshi : बिहारचा युवा खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सनं ज्याच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लावलेल्या वैभव सूर्यवंशीनं विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी केली.

हैदराबाद : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यावेळी विजय हजारे ट्रॉफीत हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांच्यासारखे खेळाडू खेळत आहेत. आज बिहार आणि बडोदा संघात सामना झाला. या सामन्यात  13 वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं धमाकेदार फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी बिहार संघाकडून खेळतो. राजस्थान रॉयल्सनं 1.10 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतलं होतं. त्यानंतर तो देशभर चर्चेत आला होता. 

बडोदा संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 49 ओव्हरमध्ये 277 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं दमदार फलंदाजी केली. त्यानं 42 बॉलमध्ये  8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 71 धावा केल्या. वैभवनं 169.05 च्या स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली. सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं आक्रमक फलंदाजी केली मात्र बिहारचा संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला. 

वैभव सूर्यवंशीनं रजनीश कुमार सोबत पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागिदारी केली. यानंतर महरौर याच्यासोबत 60 धावांची भागिदारी केली. बडोद्याच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 277 धावा केल्या होत्या. बडोद्याचा विकेटकीपर फलंदाज विष्णू सोळंकी यानं 102 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह 109 धावा केल्या. 

277 धावांचा पाठलाग करणाऱ्या बिहार संघाला 50 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 241 धावा करता आल्या. वैभव सूर्यवंशीनं 71 धावा केल्या. तर, साकीबुल गनीनं 43 आणि बिपीन सौरभनं 40 धावा केल्या. बिहारच्या संघाचा 36 धावांनी पराभूत झाला. 

आयपीएल मेगा ऑक्शनवेळी वैभव सूर्यवंशी चर्चेत

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये एक कोटी रुपयांची बोली लागणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला होता. आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सनं 13 वर्षांच्या वैभवसाठी 1.10 कोटी रुपये मोजले होते. 

वैभव सूर्यवंशीनं आतापर्यंतच्या करिअरमध्ये 5 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. तीन मॅचेस लिस्ट ए  मध्ये बडोदा विरुद्धची मॅच सोडून, 1 टी 20 मॅच देखील खेळली आहे. प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये त्यानं 100 धावा केल्या आहेत.

इतर बातम्या :

Virat Kohli And Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा अन् विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?; रवी शास्त्रींनी सगळं सांगितलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali on Suresh Dhus : सुरेश धसांनी माफी मागितली, प्राजक्ता माळीकडून प्रकरणावर पडदाWalmik Karad : CID च्या लिफ्टमध्ये जाताच मीडियासमोर हात जोडलेSuresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री कराWalmik Karad Surrendered in Pune CID : वाल्मिक कराड CID ला शरण, पुण्यात समोर येताच काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
Nanded News : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Nanded : इराणला गेलेला नांदडेचा इंजिनिअर बेपत्ता, 24 दिवसांपासून संपर्क नाही, पत्नी-कुटुंबाचा जीव टांगणीला
Gold Rate : 2025 मध्ये सोनं 90 हजारांचा टप्पा ओलांडणार, येत्या वर्षभरात 10 हजार रुपयांनी सोनं महागणार, चांदी सव्वा लाखांपर्यंत पोहोचणार?
2024 मध्ये तेजीनंतर सोनं 2025 मध्ये नवा टप्पा गाठणार, 90 हजारांपर्यंत पोहोचणार, तज्ज्ञांचा अंदाज
Embed widget