एक्स्प्लोर
Advertisement
बोल्टची 'गोल्डन हॅटट्रिक', जमैकाला 4x100 मध्ये सुवर्णपदक!
रिओ दी जेनेरिओ: वेगाचा बादशाह उसेन बोल्टनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या संघानं फोर बाय हंड्रेड मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली.
उसेन बोल्टनं सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून एक आगळीवेगळी हॅटट्रिक साजरी केली आहे. अशी कामगिरी करणारा उसेन बोल्ट हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
बोल्टनं 2008 सालच्या बीजिंग, 2012 सालच्या लंडन आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटरचं सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळं त्याच्या खात्यात आता नऊ सुवर्णपदकं जमा झाली आहेत. ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदकं जिंकणारा उसेन बोल्ट हा चौथा खेळाडू ठरला आहे.
संंबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
निवडणूक
बातम्या
Advertisement