एक्स्प्लोर
खेळाडू अनेकदा पंचांना अपशब्द वापरतात: सर्व्हे
लंडन: 'सभ्य माणसांचा खेळ' अशी क्रिकेटची ओळख आहे. पण ब्रिटनमधील अनेक पंचाचं मात्र, तसं मत नाही. कारण की, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना अनेकदा अपशब्द आणि आक्रमक विरोधाचा सामना करावा लागतो. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.
पोर्टसमाउथ विश्वविद्यालयनं हे संशोधन केलं असून अपमान झालेल्या शेकडो पंचांच्या नोंदी केल्या आहेत. यातील जवळजवळ 50 टक्के पंचांचं म्हणणं आहे की, अनेकदा अपशब्द आणि आक्रमक विरोधाचा सामना करावा लागतो.
पंच हे खेळातील महत्वाचं अंग आहे. पण यासारख्या गोष्टी फारच निराशाजनक आहेत. पण हैराण करणाऱ्या नाही. असं क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. सहा वर्षापासून डर्बीशरमध्ये पंच म्हणून भूमिका बजावणाऱ्या एका पंचानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, अनेकदा या मला अशाप्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागतं.
'बीबीसी'नं पंचाच्या हवाल्यानं सागिंतल की, 'एक व्यक्ती माझ्यावर थुंकला, तुम्हाला कसं वाटेल जर तुमच्यावर कुणी थुंकलं तर? मला वाटतं की, ही सर्वात निंदनीय आणि घृणास्पद गोष्ट आहे. माझ्याबाबत नेहमीच अपमानजनक शब्द वापरले जातात.'
या सर्व्हेमध्ये इंग्लंडच्या एकूण 763 पंचांचा समावेश होता. यामधील अर्ध्याहून अधिक जणांचं म्हणणं आहे की, त्यांना एका सत्रात बऱ्याचदा अपशब्द ऐकून घ्यावे लागतात. तर 40 टक्के पंचांचं म्हणणं आहे की, अपशब्द वापरल्यानंतर आपण त्यांना स्वत:हून विचारतो की, अंपायरिंग करावं की नाही?
पोर्टसमाउथ विद्यापीठाचे ज्येष्ठ व्याख्याते आणि या सर्व्हेमध्ये सामील झालेले टॉम वेब यांचं म्हणणं आहे की, 'आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की, ही एक आता सवय बनत चालली आहे.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement