एक्स्प्लोर

UEFA Player 2021-22 Nomination: करीम बेन्झेमासह तीन फुटबॉलपटूंचं नामांकन; कोण मारणार बाजी? 25 ऑगस्टला निर्णय

UEFA Player 2021-22 Nomination: युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशननं (UEFA) प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार (UEFA प्लेयर) साठी नामांकन यादी जाहीर केली.

UEFA Player 2021-22 Nomination: युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशननं (UEFA) प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार (UEFA प्लेयर) साठी नामांकन यादी जाहीर केली. यामध्ये रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर करीम बेन्झेमा (Karim BENZEMA) आणि गोलकीपर थिबॉट कोर्टोइस (Thibaut COURTOIS) तसेच मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केविन डी ब्रुयन (Kevin DE BRUYNE) यांचा समावेश आहे. युरोपियन फुटबॉल नियामक मंडळ यूईएफएनं शुक्रवारी 15 खेळाडूंच्या शॉर्टलिस्टमधून या तीन खेळाडूंची निवड केलीय. यापैकी कोणता खेळाडू यूईएफए प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकेल? याचा निर्णय येत्या 25 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

चॅम्पियन्स लीग 2022-23 साठी गट टप्प्यातील ड्रॉ 25 ऑगस्ट रोजी तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथे होणार आहेत.याचदरम्यान युरोपियन फुटबॉलमधील 2021-22 या वर्षात सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंना पुरस्कार दिला जाणार आहे.याचवेळी सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कारही जाहीर केला जाणार आहे. 

मोहम्मद सालाह आणि एमबापेला मागं टाकलं
बेन्झेमा आणि  कोर्टोइसनं गेल्या हंगामात रिअल माद्रिदला चौदाव्यांदा युरोपियन खिताब जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तर, डी ब्रुयननं सिटीला प्रीमिअर लीगचा खिताब जिंकवून दिला. या प्रमुख युरोपियन फुटबॉल पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 15 खेळाडूंमध्ये लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह आणि पीएसजीचा केलियन एमबाप्पे यांचाही समावेश होता. परंतु अखेर जूरीनं बेन्झेमा, कर्टिअस आणि डी ब्रायन यांची टॉप-3 नामांकनांसाठी निवड केली.

पुरस्काराच्या शर्यतीतून मेसी, रोनाल्डो बाहेर
युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराच्या यादीत लियोनल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. दोन्ही खेळाडूंना गेल्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. महत्वाचं म्हणजे, गेल्यावर्षी प्लेयर ऑफ ईअर पुरस्कार जिंकलेला जोरगिन्हो यालाही यादीत स्थान मिळवता आलं नाही. 

कोच ऑफ द ईयर पुरस्काराच्या शर्यतीत तीन जण
लिव्हरपूलचा जर्गेन क्लॉप, रिअल माद्रिदचा कार्लो अॅक्लोटी आणि मँचेस्टर सिटीचा जोसेप गार्डिओला यांना 'युईएफए कोच ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. यावेळी कार्लो एकोनलोटीने आपल्या संघाला जहाँ ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिलं. त्याचवेळी गार्डिओलाने सिटीला प्रीमियर लीग चॅम्पियन बनवलं. लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप यांनी आपल्या संघाला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत नेलं. प्रीमियर लीगमध्येही त्यांचा संघ जेतेपदाला अगदी जवळून मुकला होता.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget