Video : वेस्ट इंडीजच्या हेडन वॉल्शनं घेतला अफलातून झेल, व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
NZ vs WI : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या हेडन वॉल्श ज्यूनियरने केन विलियम्सनचा सीमारेषेवर घेतलेला झेल चांगलाच व्हायरल होत आहे.
Hayden Walsh Junior : वेस्ट इंडीज संघ नुकताच भारताविरुद्ध टी20 मालिका खेळल्यानंतर सध्या न्यूझीलंडविरुद्ध (West Indies vs New Zealand) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना नुकताच जमायका येथील सबीना पार्क मैदानत खेळवला गेला. सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ 13 धावांच्या फरकाने पराभूत झाला असला तरी या टी20 सामन्यात वेस्ट इंडीज संघाकडून अगदी शानदार फील्डिंग पाहायला मिळाली. यावेळी शिमरन हिटमायर याने सीमारेषेवर मार्टिन गप्टिलचा झेल अगदी एका हाताने पकडला, पण त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याचा वेस्ट इंडीजच्या हेडन वॉल्श ज्यूनियरने (Hayden Walsh junior) घेतलेला झेल पाहण्याजोगा होता.
वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड यांच्याती पहिल्या टी20 सामन्यात हेडन वॉल्श ज्यूनियरने केन विल्यमसनला तंबूत धाडताना अगदी अफलातून झेल घेतला. केन विल्यमसनने ओडेन स्मिथच्या ओव्हरमध्ये एका शॉर्ट बॉलवर षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. पण हा शॉट जास्त लांब जाऊ शकला नसल्याने सीमारेषेवर फील्डिंग करणाऱ्या हेडन वॉल्श ज्यूनियरने अफलातून अशी डाईव्ह मारत झेल घेतला. वॉल्शने घेतलेल्या या झेलामुळे केनचं अर्धशतक पूर्ण होऊ शकलं नाही. त्याला 47 धावांवर तंबूत परतावं लागलं.
पाहा व्हिडीओ-
#HaydenWalsh take a bow! Absolutely phenomenal fielding from him and the entire West Indian team in 1st T20I against New Zealand.
— FanCode (@FanCode) August 11, 2022
Watch all the action from the New Zealand tour of West Indies LIVE, only on #FanCode 👉https://t.co/6aagmd7vyt@windiescricket @BLACKCAPS#WIvNZ pic.twitter.com/J1taP7meTN
सामना मात्र न्यूझीलंडने जिंकला
जमायका येथील सबीना पार्क या मैदानात खेळवण्यात आलेल्या या टी20 सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला 13 धावांनी मात देत मालिकेत 1-0 ची आघाडी देखील घेतली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने 185 रन बनवले. ज्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ 186 रन करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरली. पण वेस्ट इंडीजता संघ 172 रन इतकाच स्कोर करु शकली. त्यामुळे 13 धावांनी सामना न्यूझीलंडने जिंकला. सामन्यात न्यूझीलंडकडून डेवोन कॉन्वे याने 29 चेंडूत 43 रन आणि कर्णधार केन विल्यमसनने 33 चेंडूत 47 रन केले. तर गोलंदाजी मिचेल सँटनरने 19 रन देत तीन विकेट्स घेतले.
हे देखील वाचा-