(Source: Poll of Polls)
South Africa T20 League : दक्षिण आफ्रिका लीगसाठी मुंबईपाठोपाठ लखनौ संघाने क्विंंटन डी कॉकसह दिग्गजांना केलं करारबद्ध, पाहा यादी
South Africa T20 League Lucknow Franchise : लखनौ फ्रेंचाइजीने क्विंटन डी कॉकसह जेसन होल्डर सारख्या ऑलराउंडर खेळाडूंनाही साईन केलं आहे.
South Africa T20 League Team : दक्षिण आफ्रिका टी20 लीग (South Africa T20 League) स्पर्धेची तयारी अगदी जोरदार सुरु आहे. विविध संघ आपल्या खेळाडूंची यादी जाहीर करत असून या लीगमध्ये आयपीएलमधील बरेच दिग्गज संघ सामिल असणार आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, राशिद खान, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन अशा दिग्गजांना सामिल केलं आहे. आता आयपीएल फ्रेंचाइजी लखनौने देखील त्यांच्या 5 खेळाडूंची नावं जाहीर केलं आहे.
लखनौ फ्रेंचाइजीचे पाच खेळाडू
लखनौ फ्रेंचाइजीने क्विंटन डी कॉकसह काही खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. यामध्ये क्विंटन डी कॉकसह जेसन होल्डर, केयली मेयर्स, रीसी टॉपले आणि प्रेनेलन सुब्रेयन यांची नावं आहेत. विशेष म्हणजे क्विंटन डी कॉक आणि जेसन होल्डर हे खेळाडू आयपीएलमध्ये लखनौ सुपर जॉयंट्स संघात खेळतात. दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीगमध्येही हे खेळाडू लखनौ संघात आहेत.
मुंबईचा संघही आहे दमदार
अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशीद खान (Rashid Khan), दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत, अशी माहिती आकाश अंबानीनं (Akash Ambani) दिलीय. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये हे सर्व खेळाडू मुंबई इंडियन्स केप टाऊन संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
फाफ डू प्लेसिस पुन्हा सीएसकेकडून खेळताना दिसणार
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिर्घकाळ आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा अनुभवी स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिस पुन्हा एकदा सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. सुपर किंग्सनं त्याला आगामी दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये त्यांच्या संघात करारबद्ध केलंय. फाफ डू प्लेसीसनं आयपीएलमध्ये 2010 ते 2021 पर्यंत चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.परंतु, आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या मेगा ऑक्शनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्याच्यावर बोली लावली.
हे देखील वाचा-